ट्रकची दुचाकीला धडक, एक जण ठार – दुसरा जखमी
ट्रकची दुचाकीला धडक, एक जण ठार – दुसरा जखमी
प्रतिनिधी / सागर सव्वालाखे
नांदगाव खंडेश्वर : पोलिस स्टेशन अंतर्गत राजुरा ते बोरी या मार्गावर पपईच्या फुलावर ऐशार ट्रकने एका युनिकोन दुचाकीला धडक दिल्याने एकाचा मृत्यू व दुसरा जखमी झाला. सविस्तर वृत्त असे की, अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील सोनोरा बुद्रुक येथील विनोद साहेबराव बांबर वय वर्ष ४५ व पवन ठाकरे हे दोघे कामा निमीत्त सुलतानपूर येथे दुचाकीने जात होते. यावेळी मागुन आलेल्या भरधाव लाल रंगाच्या आयशर ट्रकने जबर धडक दिली. त्यात विनोद बांबर यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते बेशुद्ध पडले. याची माहिती मिळताच राजुरा येथील सतर्क नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली. व तात्काळ रुग्णवाहिकेने नांदगाव खंडेश्वर ग्रामीण रुग्णालय गाठले. परंतु डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात येण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. व ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर येथे पोस्टमार्टम करिता ठेवले. दरम्यान धडक देनारा ट्रक पसार झाल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे. याबाबत पुढील कार्यवाही नांदगाव खंडेश्वर पोलीस करत आहे.
Breaking News- नांदगाव खंडेश्वर येथे ट्रकची दुचाकीला धडक, एक जण ठार – दुसरा जखमी*
ताज्या बातम्या घडामोडी बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा
प्रतिनिधी / सागर सव्वालाखे नांदगाव खंडेश्वर