आपला जिल्हा आपली बातमी

वाल्हेकर वाडी येथील काँग्रेस पक्ष कार्यालय मध्ये पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेस शहर अध्यक्ष कैलास कदम यांच्या राजीनाम्याची मागणी*

*वाल्हेकर वाडी येथील काँग्रेस पक्ष कार्यालय मध्ये पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेस शहर अध्यक्ष कैलास कदम यांच्या राजीनाम्याची मागणी*

पुणे :जिल्हा प्रतिनीधी उमेश पाटील

महाराष्ट्र विधानसभा २०२४ निवडणुकीचा विचार केला असता पिंपरी-चिंचवड शहरामध्ये विधानसभेचे चिंचवड २०५, पिंपरी २०६ आणि भोसरी २०७ असे तीन विधानसभा मतदार संघ आहेत. पिंपरी-चिंचवड शहराचे सध्याचे कॉग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष श्री. कैलास महादेव कदम यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड शहराला मे २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला जागा मिळाली नाही. त्याच प्रमाणे सध्या चालू असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये इतर पक्ष कमकुवत असूनही काँग्रेस पक्षाला तीन विधानसभा पैकी एकही जागा मिळालेली नाही. वास्तविक पाहता महाविकास आघाडीतील इतर पक्षाकडेही उमेदवार नव्हते. तरीही श्री. कैलास कदम यांची पक्षातील निकृष्ट व अकार्यक्षम कार्य पद्धतीमुळे पिंपरी-चिंचवड शहराला विधानसभेत एकही जागा मिळालेली नाही.

श्री. कैलास कदम यांच्या अकार्यक्षम नेतृत्वाचा विचार करता असे दिसते कि २०२३ साली प्रांताध्यक्ष मा.श्री. नानाभाऊ पटोले साहेब यांनी पुणे काँग्रेस भवन येथे आढावा बैठक घेऊन सांगितले होते कि प्रत्येक शहराध्यक्षांनी आपापल्या भागात बुथची बांधणी करून त्याचा सविस्तर रिपोर्ट सादर करावा.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा विचार केला असता १६,१४,४९८ मतदार संख्या असलेल्या शहरात एकूण १४४२ बुथ आहेत. त्यात चिंचवड ५६१, पिंपरी ३९८, भोसरी ४८३ अशी विभागणी आहे. मा. श्री. नानाभाऊ पटोले साहेबांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीनंतर ४ महिन्याच्या कालावधीनंतर परत अशाच बैठकीत मा. श्री. नानाभाऊ पटोले साहेबांनी बूथ लेवल एजंट संदर्भात विचारणा केली असता. लवकरात लवकर बूथ लेवल एजंट संदर्भात रिपोर्ट देतो असे सांगितले. त्यानंतर २ ते ३ महिन्यांनी काँग्रेस भवन येथे मा. श्रीमती सोनलताई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आढावा बैठकीत बूथ लेवल एजंट सादर करायचे होते. त्यावेळेसही तिन्ही विधानसभेत प्रत्येकी १०० पेक्षा कमी म्हणजे ३०० पेक्षा कमी बूथ लेवल एजंट दाखविण्यात आले. त्यानंतर परत मा.श्री. नानाभाऊ पटोले साहेबांच्या आढावा बैठकीत सर्व मिळून ४५० बूथ लेवल एजंट दाखविण्यात आले. व निवडणुकीच्या तोंडावर दिनांक ४ सप्टेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या पुणे काँग्रेस भवन येथील आढावा बैठकीत संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरातून एकूण १४४० पैकी फक्त ५५० बूथ लेवल एजंट दाखविण्यात आले. ते पण कागदोपत्री हे सर्व पाहता पक्ष श्रेष्ठी उमेदवारी संदर्भात काय निर्णय घेणार हे त्याच वेळेस जाणवत होते.

म्हणजेच विधानसभा निवडणुकी पूर्वी पिं.चि. शहरामध्ये पक्षाला बुथमध्ये थांबवण्यासाठी पोलिंग एजंटहि नाहीत तर पक्षाचा विजय कसा होईल. हे प्रमूख कारण पिंपरी चिंचवड शहराला एकही विधानसभेची जागा न मिळण्याचे आहे असे दिसून येते वास्तविक पाहता आम्ही सर्व पदाधिकायांनी बूथ लेवल एजंट बनविले होते पण ते आमच्याकडून न स्वीकारता वेळोवेळी आढावा बैठकीमध्ये पक्ष श्रेष्ठींना चुकीची माहिती श्री. कैलास कदम पोहचवीत होते त्याचप्रमाणे श्री. कैलास कदम यांनी त्यांच्या शहराध्यक्ष कार्यकाळात ठोस अशी पक्ष बांधणी केले नाही. म्हणजेच नवीन निकृष्ट कार्यकर्त्याचा पक्ष प्रवेश करायचा व जुन्यांचा फोनही उचलायचा नाही व भेटायचेच नाही. त्यामुळे पक्ष एकसंध ठेवता आला नाही.

पिंपरी-चिंचवड शहरातून २० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी विधानसभा २०२४ साठी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या. परंतु कित्येकांना श्री. कैलास कदम यांनी विश्वासात घेवून साधी विचारपूसहि केली नाही. एकंदरीत श्री. कैलास कदम यांच्या कारभारावर पूर्ण पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस व इतर सर्व मित्र पक्षनाराज असून सदर अध्यक्षांना लवकरात लवकर शहराध्यक्ष पदावरून बदलून तेथे योग्य व्यक्तीची नेमणूक करावी जेणेकरून काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळेल. अन्यथा पिंपरी-चिंचवड शहरात काँग्रेस पक्षाची वाटचाल अंधकारमय होऊन परिस्थिती अधोगतीकडे जाईल. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या अनुशंगाने विचार केला असता. जर श्री. कैलास कदम शहराध्यक्ष राहिले तर पक्षाला निवडणुकी मध्ये यश मिळणार नाही.

सबब श्री. कैलास महादेव कदम यांचा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष पदाचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी आम्हा सर्व काँग्रेस पदधिकारी व कार्यकर्त्यांची मागणी आहे.

दिनांक ०६/११/२०२४ रोजी दुपारी ०१:०० वाजता कॉग्रेस पक्ष कार्यालय वाल्हेकरवाडी येथे पिंपरी चिंचवड कॉग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये श्री. कैलास कदम यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली व तसा ठराव प्रांत अध्यक्ष श्री नाना भाऊ पटोले यांना पाठविण्यात आला सदर पत्रकार परिषदे साठी खालील पदाधिकायांची उपस्तिथी होती.

श्री. भरत शंकर वाल्हेकर वरिष्ठ उपाध्यक्ष पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) कॉग्रेस कमिटी, डॉ. श्री. विश्वास गजरमल:- सदस्य अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अनुसूचित श्री.रवी रमेश नांगरे अध्यक्ष विद्यान कौशल्य तंत्रञान विभाग, श्री. विजय ओव्हाळ :- अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग, श्री. विशाल भानुदास सरवदे :- अध्यक्ष रोजगार व स्वयंरोजगार विभाग, श्री. सुरज गायकवाड: अध्यक्ष परिवहन विभाग, सौ. प्रतिभा अर्जुन कांबळे :- अध्यक्ष औद्योगिक सेल, श्री. झेवियर अँथोनी अध्यक्ष ग्राहक संरक्षण सेल, व तंत्रआन विभाग, श्री. विकास कांबळे अध्यक्ष रिक्षा संघटना, श्री. गणेश नांगरे :- अध्यक्ष सौस्कतिक विभाग, सौ. गौरीताई प्रमोद शेलार अध्यक्ष पथारी सेल,, श्री. दिनकर कृष्णा भालेकर महासचिव इरफान शेख : सरचिटणीस सौ दिपाली भालेकर महिला काँग्रेस नेत्या इत्यादी उपस्थित होते

24 News Network

ताज्या बातम्या घडामोडी बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 9022978588. चॅनल ला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा https://www.youtube.com/@Newsnetworklive24 पोर्टल वर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा. https://24newsnetwork.live/

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button