Parbhani: क्षेत्र त्रिधारा येथे अमावस्या व यात्रे निमित्त हजारो भाविकांनी घेतले दर्शन.
Parbhani: क्षेत्र त्रिधारा येथे अमावस्या व यात्रे निमित्त हजारो भाविकांनी घेतले दर्शन
Parbhani :- परभणी तालुक्यातील श्री क्षेत्र त्रिधारा येथे वार सोमवार 30 डिसेंबर रोजी आलेल्या अमावस्या व यात्रेनिमित्त येथील असलेल्या गंगेत स्नान करून हजारो भाविकांनी दर्शन घेतले. भाविकांसाठी महा प्रसादाचे आयोजित करण्यात आले होते. यात्रेत निमित्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून व भाविक(devotee) भक्तांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून ताटकळस पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दोन लाखापेक्षा जास्त भक्तांनी घेतलं दर्शन
सकाळ पासून सायंकाळ पर्यंत रेलचेल सुरूच
दोन लाखापेक्षा जास्त भक्तांनी घेतलं दर्शन
परभणी तालुक्यातील क्षेत्र त्रिधारा देवस्थान हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे .नेहमीच भाविकांची दर्शनासाठी रेलचेल असते मात्र वर्षी सोमवारी अमावास्या व यात्रा आल्याने अमावास्या व यात्रेनिमित्त जवळपास सकाळ पासून ते सायंकाळ पर्यंत एक लाख पेक्षा जास्त भाविकांनी दर्शन घेत महा प्रसादाचा लाभ घेतला.भाविकांचे क्षद्धाथान असलेल्या श्री क्षेत्र त्रिधारा या ठिकाणी असलेल्या गंगेत त्रिसंगम झालेल्या गंगेत स्थान केल्याने अनेक दुख नाहीसे होतात अशी अनेक भाविकांची भावना आहे. परभणी जिल्ह्यातील भाविकांचे क्षद्धाथान असलेल्या क्षीक्षेत्र त्रिधारा या ठिकाणी ओंकारनाथ महाराजांचे मंदिर आहे. या ठिकाणी असलेले ओंकारनाथ महाराजांचे जागृत देवस्थान असल्याने येथील दर्शनासाठी परभणी जिल्ह्यासह अनेक भागातून भाविक हे मोठ्या प्रमाणावर येत असतात.
सकाळ पासून सायंकाळ पर्यंत रेलचेल सुरूच
अमावस्या व यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांसाठी वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती. ताडकळस पोलिस ठाण्याच्या वतीने येथील ठिकाणी असलेल्या प्रत्येक मंदिरात महीला व पुरुष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या अमावास्या व यात्रेनिमित्त जिल्ह्यासह पर जिल्ह्यातुन मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची गर्दी होती. क्षी क्षेत्र त्रिधारा हे परभणी जिल्ह्य़ातील नागरिकांसह परीसरात नागरिकांचे क्षद्धाथान आहे. परभणी जिल्ह्यासह हिंगोली, नांदेड लातूर व ईतर भागातील नागरिकांची दर अमावस्याला क्षी क्षेत्र त्रिधारा येथे भाविकांची मोठी गर्दी होत असते.भाविकांनी या ठिकाणी असलेल्या गंगेत पवित्र स्नान करून त्रिधारा या ठिकाणी असलेल्या शनी मंदिर, हनुमान मंदिर, महादेव मंदिर, दत्तात्रेय मंदिर, पांडुरंग मंदीरासह येथील असलेल्या ओंकारनाथ महाराजांचे दर्शन घेऊन या ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी सकाळी नाश्त्याची व दुपारी जेवणाची व्यवस्था असल्याने भाविकांनी प्रसाद घेतला.या अमावास्या व यात्रेनिमित्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा पोलीस प्रशासनाच्या व ताटकळस पोलीस ठाण्याच्या वतीने प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा शहारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवकांत नागरगोजे यांच्यासह बिट जमादार अप्पाराव वराडे, गणेश लोंढे,उदयय चंदेल, महिला पोलिस रंजना खिल्लारे, पल्लवी दुधारे यांच्यासह पोलिस अधिकारी पोलिस कर्मचारी या ठिकाणी असलेल्या अमावास्या व यात्रेनिमित्त बंदोबस्तात उपस्थित होते