बोरीतून भांबळे यांना तर कौसडीमधून बोर्डीकर यांना आघाडी
बोरीतून भांबळे यांना तर कौसडीमधून बोर्डीकर यांना आघाडी
बोरी / प्रतिनिधी गजानन साबळे परभणी
जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघात बोरी, नागापूर तांडा येथील १४ मतदान केंद्रांवर मेघना बोर्डीकर यांना २ हजार ८३६ तर विजय भांबळे यांना ३ हजार ८०९, सुरेश नागरे यांना १ हजार ३५७ असे मतदान झाले. या ठिकाणी माजी आमदार विजय भांबळे यांना ९७३ मताची आघाडी मिळाली तर कौसडी या ठिकाणी मेघना बोर्डीकर यांना २ हजार ४०६ तर विजय भांबळे यांना १ हजार ८०० मतदान झाले. या ठिकाणी मेघना बोर्डीकर यांना ६०६ मतांची आघाडी
मिळाली. या ठिकाणी ग्रामपंचायतवर सुरेश नागरे यांचे वर्चस्व असताना बोर्डीकर यांना आघाडी मिळाली, हे विशेष !
वर्णा या ठिकाणी मेघना बोर्डीकर यांना ३२६ तर विजय भांबळे यांना ८३० मतदान झाले. यामध्ये ४९५ मतांची आघाडी विजय भांबळे यांना मिळाली. निवळी या ठिकाणी बोर्डीकर यांना ५५४ तर भांबळे यांना ४९५ मतदान झाले या ठिकाणी बोर्डीकर यांना ५९ मतांची आघाडी मिळाली. वाघी बोबडे येथे बोर्डीकरांना ३३१ तर भांबळे यांना २९१
मतदान मिळाले. या ठिकाणी ४० मतांची आघाडी बोर्डीकर यांना मिळाली. गणपूर येथे बोर्डीकर यांना १६८ तर भांबळे यांना १०८ या ठिकाणी ६० मतांची आघाडी बोर्डीकर यांना मिळाली. शेक येथे बोर्डीकर यांना २५८ तर भांबळे यांना १७३ मतदान झाले. पिंपळगाव येथे बोर्डीकर यांना ४३२ तर भांबळे यांना १८२ मते मिळाले असून बोर्डीकर यांना २४० मतांची आघाडी मिळाली आहे. रोहिला पिंपरी येथे बोर्डीकरांना ५१६ तर भांबळे यांना ४४२ मते मिळाली असून बोर्डीकरांना ७४ मतांची लीड मिळाली
आहे. तर कुंभारी येथे बोर्डीकर यांना ४२५ मते तर भांबळे यांना २६५ मते मिळाले असून या ठिकाणी बोर्डीकर यांना १६० मतांची आघाडी मिळाली आहे. चिमणगाव येथे बोर्डीकर यांना ५०७ मते तर भांबळे यांना ४५७ मते मिळाली, जवळा खुर्द येथे बोर्डीकर यांना ५६१ तर भांबळे यांना २९ मतांवर समाधान मानावे लागले. दुधगाव येथे बोर्डीकर ९२९ तर भांबळे यांना १ हजार ६६ मतदान झाले. कसर येथे बोर्डीकर यांना ४४० तर भांबळे यांना २९३, नागरगाव येथे बोर्डीकर यांना ४२० तर भांबळे
यांना २४७ मतदान झाले. रिडज येथे बोर्डीकर यांना ६७५ तर भांबळे यांना ३८० मतदान मिळाले. या ठिकाणी २९५ मतांची आघाडी बोर्डीकर यांना मिळाली. देवगाव धानोरा येथे बोर्डीकरांना २०८ मते तर भांबळे यांना ११२, नागरे यांना ३४९ मतदान मिळाले आहे. आडगाव दराडे येथे बोर्डीकर यांना २९९ तर भांबळे यांना २१०, नागरे यांना ४२२ मतदान झाले आहे. सांगळेवाडी येथे बोर्डीकर यांना १२५ मते तर भांबळे यांना ६ मतदान झाले या ठिकाणी २१० मतदान सुरेश नागरे यांना झाले आहे.