जगदीश मानवतकर यांनी नरेंद्र मोदींना दिले आपल्या रक्ताने निवेदन
जगदीश मानवतकर यांनी नरेंद्र मोदींना दिले आपल्या रक्ताने निवेदन
जगदीश मानवतकर यांनी नरेंद्र मोदींना दिले आपल्या रक्ताने निवेदन .
वाशीम येथील जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत जगदीश मानवतकर यांनी आपल्या रक्ताने नरेंद्र मोदी यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये त्यांनी असे नमूद केले आहे की , आपल्या मंत्रिमंडळातील अमित शहा यांनी संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संसदेमध्ये अपमान केला असून आपण तात्काळ अमित शहा यांना केंद्रीय गृह मंत्री पदावरून काढून टाकावे. अमित शहा यांनी असे म्हटले आहे की ” आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, अशी म्हणायची आता फॅशन झालेली आहे. आपण आंबेडकर यांच्या नावाऐवजी देवाचं नाव घेतलं असतं तर आपल्याला स्वर्गात जागा मिळाली असती .” असे बोलून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. या वक्तव्यामुळे जगदीश मानवतकर यांच्या भावना दुखावल्या गेल्याने त्यांनी नरेंद्र मोदी यांना आपल्या रक्ताने निवेदन द्वारे कळविले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान सहन केला जाणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर आम्हाला हे जीवन नरकासारखे वाटले असते. आम्हाला स्वर्गात जाण्याची काहीच गरज नाही. कारण आम्हला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच जिवंतपनी स्वर्ग अनुभवण्यास मिळत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जर नसते तर आमचे जगणे हे नरकापेक्षाही खराब झाले असते. त्यामुळे आम्हाला स्वर्गात जायाची काहीच गरज नाही. आपण अमित शहा यांना सुचवावे की , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच आज आपण हे गृहमंत्री आहात आणि मी सुद्धा पंतप्रधान आहे. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आपण घेतलेले विधान मागे घ्यावे .
सर्व जगातील आंबेडकर अनुयायी यांची जाहीर माफी मागावी आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. या प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी वाशिम यांच्यामार्फत नरेंद्र मोदी यांना दिले आहे. निवेदन मध्ये जगदीश मानवतकर यांनी आपल्या रक्तातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र काढले असून त्यामध्ये दहा पानांवर आंबेडकर,आंबेडकर ,आंबेडकर असे लिहून त्यासोबतच जय भीम, जय भीम, जय भीम, असे लिहून अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे . त्यासोबतच जगदीश मानवतकर यांनी निवेदनामध्ये अशी मागणी केली आहे की, परभणी येथील दलित दंग्यामध्ये शहीद झालेले सोमनाथ सूर्यवंशी या युवकाच्या घरच्यांना 25 लाखाची तात्काळ आर्थिक मदत मिळाली पाहिजे, या दंगलीतील भीमसैनिकांवरचे गुन्हे वापस घ्यावेत , या भीमसैनिकांवर लाठी चार्ज करणाऱ्या पोलिसांना नीलंबित करावे, त्यासोबतच सोमनाथ सूर्यवंशी यांना मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना दोषी करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, दोषी पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावे , परभणी येथील मुख्य आरोपी याला अटक करून जन्मठेप करावे , त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या प्रकरणाची उच्च CBI चौकशी लावावी . या सारख्या अनेक मागण्या जगदिश मानवतकर यांनी निवेदनामार्फत केल्या आहेत. या निवेदनाच्या वेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाशिम जयंती उत्सव समिती 2024 चे उपाध्यक्ष गोवर्धन राउत साहेब , अखिल भारतीय मातंग महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष संजय वैरागडे साहेब, सम्राट टाईम चे मुख्य संपादक तरुण पठाण पत्रकार विनोद तायडे साहेब, बहुजन भारत पार्टीचे ऑटो सेल ता. अध्यक्ष राहुल खडसे , रवी टोके , मनोजभाऊ पुंडगे , नितीन बांगर , अक्षय इंगोले, प्रदीप खडसे , सविधान ढोले , वंदनाताई भगत यांच्यासह बऱ्याच आंबेडकर अनुयायी आणि आंबेडकर चळवळीतील कार्यकरते , पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती .
या निवेदन दिल्या नंतर जगदीश मानवतकर यांनी अमित शहा यांना पत्र सुद्धा पाठविले आहे . त्यामध्ये त्यांनी असे कळविले आहे की, आपण तात्काळ आंबेडकर अनुयायी यांची जाहीर माफी मागावी आणि आपण बोललेले स्टेटमेंट मागे घ्यावे , आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. अशी मागणी जगदीश मानवतकर यांनी निवेदन आणि पत्राद्वारे केली आहे.