जनतेच्या हिताचे उच्चांक गाठण्यासाठी भरिव कामगिरी करणार – ना. मेघनाताई बोर्डीकर
राज्यमंत्री ना. मेघनाताई बोर्डीकरांचा जिंतुरात नागरी सत्कार
जनतेच्या हिताचे उच्चांक गाठण्यासाठी भरिव कामगिरी करणार – ना. मेघनाताई बोर्डीकर
राज्यमंत्री ना. मेघनाताई बोर्डीकरांचा जिंतुरात नागरी सत्कार
जिंतूरः राज्यमंत्री ना. मेघनाताई बोर्डीकर पहिल्यांदाच शहरात आल्यानंतर नागरी सत्कार समितीच्यावतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर, सौ. मिनाताई बोर्डीकर, गंगाधरराव बोर्डीकर, भावनाताई बोर्डीकर, अॅड. हरिहरराव देशमुख, संदीप शर्मा महाराज, अॅड. सुंदरराव चव्हाण, सुरेश भुमरे, ब्रिजगोपाल तोष्णीवाल, प्रभाकर वाधीकर, विनोद दुधगावकर, सचिन गोरे, दिपक महाराज, गोविंद थिटे, नैनाताई बोर्डीकर व इतर.
जिंतूर : सेलू मतदारसंघ ही माझी जिंतूर सेलू मायभूमी आहे. तिच्या
कल्याणासाठी सर्वोतोपरी प्रयत्न तर करणारच, त्यासोबत पक्षाने आमदारकीच्या दुसऱ्याच यशानंतर माझ्यावर विश्वास टाकून अतिशय महत्वपूर्ण खाते देऊन राज्य मंत्रीपदाची जबाबदारी सोपवली, मी ते पूर्ण निष्ठेने पार पाडून जनतेच्या हिताचे उच्चांक गाठण्यासाठी भरीव कामगिरी करणार असल्याची ग्वाही राज्यमंत्री ना. मेघनाताई बोर्डीकर यांनी जिंतूरकरांच्या नागरी सत्कार सोहळ्यात दिली.
ना. मेघनाताई बोर्डीकर यांना राज्यमंत्री पद मिळाल्यानंतर प्रथमच जिंतूर नगरीत आगमन झाले. बुधवार २५ डिसेंबर रोजी शहरातील बाजार समितीच्या मैदानात नागरी समितीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर बोलत होत्या. यावेळी मंचावर माजी आ रामप्रसाद बोर्डीकर, सौ. मीनाताई बोर्डीकर, गंगाधर बोर्डीकर, भावनाताई बोर्डीकर, अॅड. हरिहरराव देशमुख, संदीप शर्मा महाराज, अॅड. सुंदरराव चव्हाण, सुरेश भुमरे, ब्रिजगोपाल तोष्णीवाल, प्रभाकर वाघीकर, विनोद दुधगावकर, महेश चेतन महाराज, अमृतेश्वर महाराज, प्रताप देशमुख, सचिन गोरे, दिपक महाराज, रमेश महाराज जोगवाडकर, बंडू महाराज, गरड महाराज, गोविंद थिटे, सपनाताई यादव
पचास वर्षाच्या कार्यकिर्दीत सर्वाधिक आनंद झाला माजी आ बोर्डीकर मतदारसंघासह परभणी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास घडवून
आणण्यासाठी भाजपा पक्षश्रेष्ठिनी मेघना बोर्डीकरांच्या रुपात राज्य मंत्री पदाची संधी उपलब्ध करून दिली. आता बोर्डीकर परिवार इथेच थांबणार नाही. तर आणखीन अनेक इतिहास घडवणार, बोर्डीकर कुटुंब सत्तेत राहील किंवा राहणार नाही, पण जनतेच्या सेवेत कायमस्वरूपी राहील, मी मंत्रिपदासाठी तब्बल पंचवीस वर्षे स्वप्न बघितले, पण स्वप्न साकार
झाले नाही. माझे स्वप्न लेकीच्या रुपात पूर्ण झाल्याने पचास वर्षाच्या कार्यकिर्दीत सर्वाधिक आनंद झाले आहे. माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर,
उपस्थिती होती. यावेळी नागरी सत्कार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ना. मेघनाताई बोर्डीकर यांच्यासह माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर आणि मीनाताई बोर्डीकर यांचा भगवान श्रीरामची मूर्ती देऊन भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पुढे बोलतांना ना. मेघनाताई म्हणाल्या की. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी जाती जातीत भेद निर्माण केला. षडयंत्र रचले होते. पण राजकारणात पदार्पण केल्यापासून मी कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान घेऊन काम केले. सत्तेतील अडीच वर्षांत विकासाची गंगा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, जनतेने विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता माझ्या विकासकामांची पावती देत मला सलग दुसऱ्यांदा सेवेची संधी दिली. भाजपाने माझ्यावर राज्यमंत्र्यांची महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. राज्यातील महिलांना सक्षम करणार, सोबतच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या योजना आणून भरीव कामगिरी करणार आहे. यापुढे मी सत्तेत असो किंवा नसो मी माझे अखंड आयुष्य जनतेच्या सेवेसाठी अर्पण केले असल्याचे उदगारही त्यांनी काढले. या सत्कार सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी गोविंद थिटे, वसंतराव शिंदे, ब्रिजगोपाल तोष्णीवाल, आत्माराम पवार, सुनील
ना. मेघना बोरीकरांचे जिंतूर नगरीत जंगी स्वागत
ना मेधना बोर्डीकर यांना राज्याचे मंत्रीपद मिळाल्यानंतर त्या प्रथमच जिंतूर नगरीत येत असल्यामुळे भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सामान्य जनतेने शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुभेच्ऊंची होर्डिंग्ज लावले होते. ठिकठिकाणी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. तर जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करून ना मेघना बोर्डीकर यांचे ढोलताश्यांच्या गजरात आणि प्रचंड आतिषबाजी करून जंगी स्वागत केले.
गोपाळ रोकडे, अॅड सुनील बुधवंत, किरण वट्टमवार, प्रभाकर वाधिकर, एकनाथ देशमुख, सत्यनारायण शर्मा, संजय कोकडवार, संतोष देशमुख डॉ दुर्गादास कान्हडकर, मतीन तांबोळी, प्रदीप चौधरी, संदीप लकडे, विकास जाधव, गिरीष जोशी, डॉ देवराज कन्हाळे, भगवानराव वटाणे, शेख अथर, प्रकाश पवार, सुनील खिस्ते, सत्यनारायण दरगड, सुभाष काबरा, भगवान देशमुख, कैलास खंदारे, गजानन घुगे, शिवाजी काळे, प्रभाकर दराडे, रवी घुगे, पप्पू डोंबे, गजानन चव्हाण, सागर शिंदे, संतोष ढोणे, रवी रणबावळे, मंगेश घुगे, रमेश धवळे, संदीप भुतडा, रमण तोषणीवाल, संतोष माने, यतराज दधगावकर, रामप्रसाद घले,