आपला जिल्हा आपली बातमी

मराठवाड्यात अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा; ३० डिसेंबरपासून वाढणार थंड

२७-२८ डिसेंबरदरम्यान विभागात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

मराठवाड्यात अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा; ३० डिसेंबरपासून वाढणार थंड 

२७-२८ डिसेंबरदरम्यान विभागात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

मराठवाड्यात अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा; ३० डिसेंबरपासून वाढणार थंडी.

(प्रतिनिधी गजानन साबळे परभणी) 

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा आणि विदर्भात २७ व २८ डिसेंबरदरम्यान मध्य महाराष्ट्र व मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. ३० डिसेंबरपासून थंडीचा जोर वाढण्याचाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे

२७ डिसेंबरला दुपारपासून मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात सर्वात प्रथम दक्षिण मराठवाडा व इतर जिल्ह्यांतील काही भागांमध्ये होईल. शुक्रवारी रात्रीपर्यंत वादळी पाऊस पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात हजेरी लावेल, ज्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यांतील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.२८ डिसेंबरच्या पहाटेपर्यंत वादळी वाऱ्यासह मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची स्थिती असेल. या दिवशी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. विदर्भात आणि मराठवाड्यात कमाल तापमानात थोडी घट होईल.२९ डिसेंबरला मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाण वगळता बहुतांश भागांत स्थिर हवामान असेल. डिसेंबरपासून थंडीत वाढ होईल.

शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार पीक पेरणीचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. प्राण्यांना आणि काढणी केलेल्या पिकांना पाऊस, गारपीट आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे. वादळ आल्यास झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहन देखील कृषी विभागाने केले आहे.

24 News Network

ताज्या बातम्या घडामोडी बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 9022978588. चॅनल ला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा https://www.youtube.com/@Newsnetworklive24 पोर्टल वर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा. https://24newsnetwork.live/

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button