नऊ वर्षांचा असताना अक्षय घरी आला, २१ व्या वर्षापासून अनैतिक संबंध सुरु, मोहिनी मामीसोबत नातं कसं बदलत गेलं?
Mohini Wagh Akshay Jawalkar Relationship : आरोपी अक्षय जवळकर हा ३२ वर्षांचा आहे. २००१ मध्ये तो आई वडिलांसोबत फुरसुंगी येथे वाघ कुटुंबाच्या घरात भाड्याने राहायला आला.
नऊ वर्षांचा असताना अक्षय घरी आला, २१ व्या वर्षापासून अनैतिक संबंध सुरु, मोहिनी मामीसोबत नातं कसं बदलत गेलं?
Mohini Wagh Akshay Jawalkar Relationship : आरोपी अक्षय जवळकर हा ३२ वर्षांचा आहे. २००१ मध्ये तो आई वडिलांसोबत फुरसुंगी येथे वाघ कुटुंबाच्या घरात भाड्याने राहायला आला.
Message 24networknews on WhatsApp. https://wa.me/message/WNFROWSQQXDAD1
पुणे : भाजपचे विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आणि हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात नवनवीन गोष्टी समोर येत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय जवळकर आणि सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ यांचे गेल्या अकरा वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याचं तपासात समोर आलं आहे.काय आहे प्रकरण?
आरोपी अक्षय जवळकर हा ३२ वर्षांचा आहे. २००१ मध्ये तो आई वडिलांसोबत फुरसुंगी येथे वाघ कुटुंबाच्या घरात भाड्याने राहायला आला. त्यावेळी तो अवघ्या नऊ वर्षांचा होता. अक्षय आणि सतीश-मोहिनी वाघ यांचा मुलगा जवळपास एकाच वयाचे असल्यामुळे दोघांमध्ये मैत्री झाली.साधारण २०१३ मध्ये अक्षय २१ वर्षांचा झाल्यापासून त्याचे मोहिनी वाघ यांच्यासोबत अनैतिक संबंध सुरु झाल्याचे बोलले जाते. मोहिनी सध्या ४८ वर्षांची आहे, म्हणजे त्यावेळी ती ३७ वर्षांची होतीमुलाच्या मित्रावर जीव जडला
२००१ ते २०१६ अशा १५ वर्षांच्या काळात जवळकर कुटुंब वाघांच्या घरात भाड्याने राहत होतं. त्यापैकी २०१३ ते २०१६ अशा तीन वर्षांच्या काळात मोहिनीचे मित्राच्या मुलासोबतच विवाहबाह्य संबंध सुरु होते.दरम्यानच्या अक्षय सिव्हिल इंजिनिअर झाला. त्याने आपला व्यवसाय सुरु केला. या काळातही अक्षय आणि मोहिनी यांचे संबंध कायम होते. या प्रकाराची कुणकुण सतीश वाघ यांना लागली. त्यामुळे वाघ आणि जवळकर कुटुंबात खटके उडाले. २०१६ मध्ये जवळकर कुटुंब तिथूनच ४०० ते ५०० मीटर दूर असलेल्या एका घरात भाड्यावर राहायला लागलं. तरीही दोघांमधील संबंध टिकून राहिले.हत्येची तीन कारणं
मोहिनी वाघ यांच्या दाव्यानुसार पती सतीश वाघ यांच्याकडून त्यांना सतत मारहाण केली जायची. त्याचबरोबर घरातील आर्थिक व्यवहार त्यांना आपल्या हातात हवे होते. अक्षय जवळकर याच्यासोबत असलेल्या संबंधांची कबुलीही मामीने दिली आहे.