Parbhani Burglary: अबब…पोलीसाचे घर फोडले; पाच लाखाचा मुद्देमाल लंपास
परभणी शहरातील चिद्रवार नगरात बुधवारी सकाळी उघडकीस आली घटना
Parbhani Burglary: अबब…पोलीसाचे घर फोडले; पाच लाखाचा मुद्देमाल लंपास
Parbhani Burglary: अबब…पोलीसाचे घर फोडले; पाच लाखाचा मुद्देमाल लंपास
परभणी शहरातील चिद्रवार नगरात बुधवारी सकाळी उघडकीस आली घटना
परभणी (Parbhani Burglary) : अज्ञात चोरट्यांनी पोलिसाचे घर फोडत रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने मिळून जवळपास ५ लाख १० हजाराचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना परभणी शहरातील चिद्रवार नगरात बुधवार ४ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
या (Parbhani Burglary) घटनेविषयी अधिक माहिती अशी की, सतीश रणेर हे चिद्रवार नगरात किरायाच्या घरात वास्तव्यास आहेत. ३ डिसेंबरला सायंकाळी ते घराला कुलूप लावून सारंगपुर गावाकडे गेले होते. ४ डिसेंबरच्या सकाळी त्यांना चुलत भावाने फोन करुन तुम्ही घरी आले का, असे विचारले. यावर सतीश यांनी मी गावाकडेच आहे, असे उत्तर दिले. संबधिताने तुमच्या घराचे कुलूप तुटलेले दिसत आहे, असे सांगितले.
त्यानंतर सतीश रणेर हे परभणीला आले. त्यांनी घरातील साहित्याची पाहणी केली असता कपाटात ठेवलेले रोख साडे तीन लाख व सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे दिसून आले. जवळपास पाच लाख रुपायांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. (Parbhani Burglary) घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. कोतवाली पोलीस स्टेशनचे पोनि. दिपक दंतुलवार, पोउपनि. पोपुलवार, शेख गौस आदींनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथक, ठसे पथकालाही पाचारण करण्यात आले. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.