Parbhani Government offices: परभणीत शासकीय कार्यालयांकडे 47 कोटी 58 लाखांची थकबाकी
Parbhani Government offices: परभणीत शासकीय कार्यालयांकडे 47 कोटी 58 लाखांची थकबाकी
परभणी (Parbhani Government offices) : शहरात असलेल्या शासकीय कार्यालयांकडे ४७ कोटी ५७ लाख ९३ हजार ९२३ रुपये इतका मालमत्ता कर थकला आहे. थकीत मालमत्ता कराचा डोंगर वाढत असून महापालिकेला आपला गाडा ओढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत मालमत्ता व पाणीपट्टी कर असतो. शहरातील मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणात कर थकीत आहे. त्यामुळे महापालिकेला आर्थिक नियोजन करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरामध्ये रहिवाशी, वाणिज्य, औद्योगिक अशा एकूण ७८ हजार ३७४ मालमत्ता आहेत. एप्रिल २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत शहरातील मालमत्ता धारकांकडे ८ कोटी ७४ लाख ६६ हजार २९२ एवढा करत थकीत आहे.
मालमत्ताधारकांकडे एकूण थकीत कराची रक्कम ही विलंब शास्तीसह १६८ कोटी ४१ लाख ३० हजार २८७ एवढा करत थकीत आहे. तर विना विलंब शास्तीसह ही रक्कम १०९ कोटी ६८ लाख ९३ हजार २७१ रुपये एवढी होते. शहरातील शासकीय कार्यालयांकडे देखील कर थकीत आहे. परभणी शहर महापालिकेच्या प्रभाग समिती अ.ब.क. अंतर्गत वसुली पथकांमार्फत वसुलीची कार्यवाही करण्यात येत आहे. थकीत मालमत्ताधारकांनी त्यांच्याकडे थकीत असलेला कर भरुन महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कर थकल्याने महापालिकेचा आर्थिक गाडा ओढणे अवघड होऊन बसले आहे.
कर्मचारी वेतन तसेच विविध विकासकामे करताना निधीची चणचण भासत आहे. आर्थिक ताळमेळ बसविताना महापालिकेची मोठ्या प्रमाणात अडचण होत असल्याचे दिसत आहे.
२ हजार ६९९ मालमत्ताधारकांकडे अधिक कर
शहरातील २ हजार ६९९ मालमत्ता धारकांकडे ५० हजारांच्या वर कर थकबाकी आहे. पाच वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून मालमत्ता कर थकीत असणार्या मालमत्तांची संख्या २ हजार १५४ इतकी आहे.
शहर महापालिकेचा मालमत्ता कर थकला
मालमत्ताधारकांनी कर भरणा करावा
शहरातील मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणात कर थकीत आहे. शासकीय कार्यालयांकडे थकीत करासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. निधी मिळाल्यानंतर ते कर भरतील. शहरातील नागरीकांनी कराचा भरणा करावा. नियमित तसेच ऑनलाईन पध्दतीने कर भरणार्यांना सुट देण्यात येणार आहे. करासाठी महापालिका आपल्या दारी ही संकल्प राबविण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त धैर्यशील जाधव यांनी सांगितले.