प्लॉट नावावर करण्याची मागणी करत विवाहितेला फायटरने मारहाण
प्लॉट नावावर करण्याची मागणी करत विवाहितेला फायटरने मारहाण
मानवत तालुक्यातील पाळोदी येथील घटना सासरच्या मंडळीवर गुन्हा
परभणीः (गजानन साबळे परभणी) तुझ्या नावावर असलेली प्लॉट नोटरी आम्हाला वापस का देत नाही, असे म्हणत सासरच्या मंडळींनी फायटरने विवाहितेला मारहाण केली. ही घटना १ डिसेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास विवाहितेच्या आईच्या घरासमोर मानवत तालुक्यातील पाळोदी येथे घडली. या प्रकरणी सासरच्या
मंडळीवर मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख आफरीन यांनी तक्रार दिली
आरोपींनी संगणमत करत
विवाहितेला तुझ्या नावावर असलेले
प्लॉट नोटरी आम्हाला वापस का देत
नाही, या कारणावरून काठी,
फायटरने मारुन जखमी केले.
थापडबुक्क्यांनी मारहाण करत जीवे
मारण्याची धमकी दिली. शेख रसुल,
शेख गुलाब, शेख उस्मान, शेख
रेहाना यांच्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पोह.
भारत नलावडे करत आहेत