परभणी येथील भारतीय संविधान शिल्प विटंबना निषेधार्थ उमरीत कडकडीत बंद
परभणी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्या समोर ठेवण्यात आलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची सोपान पवार या जातिवादी समाज कंटकाकडुन विटंबना
परभणी येथील भारतीय संविधान शिल्प विटंबना निषेधार्थ उमरीत कडकडीत बंद
उमरी – (किशोर कवडीकर )
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार प.पु. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्या समोर असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची एका माथेफिरूने तोडफोड करून भारतीय संविधानाचा अवमान केल्या प्रकरणी दोषिला कठोर शिक्षा देण्यात यावी आणि या मागे असणाऱ्या यंत्रणेचा शोध घेण्यात यावा अशी मागणी शासनाकडे मा.तहसिलदार उमरी यांच्या मार्फत करण्यात येऊन परभणी येथील घटनेचा उमरी शहरातील नगर परिषद जवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागेवर सर्व आंबेडकरी चळवळीतील नेते व सर्व संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला
परभणी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्या समोर ठेवण्यात आलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची सोपान पवार या जातिवादी समाज कंटकाकडुन विटंबना केल्याची बातमी कळताच या घृणास्पद कृत्या प्रकरणी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून असे निच कृत्य त्यांच्याकडून करून घेणाऱ्यांना पाठीशी* घालणाऱ्याचा शोध पोलीस प्रशासना कडून लवकरात लवकर घेण्यात यावा या मागणीसाठी तसेच घटनेचा निषेध करण्यासाठी 13 डिसेंबर रोजी ऊमरी शहर कडकडीत बंद ठेवून डॉ आंबेडकर चौकात निषेध सभेचं आयोजन करण्यात आले होते.यावेळी शासकीय गुत्तेदार मा.संजीव विठ्ठलराव सवई आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते गंगाधरराव सवई, माजी उपनगराध्यक्ष अनिल सोनकांबळे, ईश्वर सवई, डी जी तुपसाखरे, संदिप गोवंदे, पत्रकार कैलास सोनकांबळे, साहेबराव तुरेराव,पि जी गिलच्चे, वसंत सवई ,राजेश सवई, पत्रकार किशोर कवडीकर,बालाजी वाघमारे सरपंच मारोती भेरजे सरपंच अकबर शेख ,आनंदा पवार , स्वप्निल भोसीकर भीमआर्मी जिल्हा अध्यक्ष, लांडगे,सोनुभाऊ वाघमारे, बालाजी देवके,संदेश गायकवाड सचिन खंडेलोटे, भिमराव वाघमारे, संदीप गोवंदे,अजित सोनकांबळे, सिध्दार्थ वाघमारे, संदीप लांडगे,दिंगाबर गायकवाड, राहुल खंदारे, सुरेश वाघमारे पत्रकार यांच्या सह अनेक आंबेडकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन परभणी येथील घटनेचा जाहीर निषेध केला आहे या बंदला डॉ. आण्णाभाऊ साठे क्रांती सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला,यावेळी उपस्थित संघटनेचे मराठवाडा सचिव किशोर कवडीकर, जिल्हा कार्याध्यक्ष संजय वाघमारे ,शहर अध्यक्ष संतोष नामेवार, अजय कवडीकर,साहेबराव वाघमारे,शिवाजी सोंकुळे, रामदास हैबतकर,के. वाय.देवकांबळे सामाजिक कार्यकर्ते, बोईवार यांच्यासह या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग देशमुख गोरठेकर, यांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त करत पाठींबा दिला आहे.तसेच मुस्लिम समाजातील कांहीं संघटनांनी पाठिंबा देत जावेद खान, यांनी आपले विचार व्यक्त करत घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध केला आहे.
या बंद मध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडला नसुन पोलिस उपनिरीक्षक ए.एस. माने ,व त्यांच्या सर्व पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.