आपला जिल्हा आपली बातमी

 परभणीत एसटी बसमध्ये मोठा वाद; प्रवाशाला मारहाण, बसची काच फोडली

गंगाखेड शहरातील परळी नाका परिसरात घटना

 परभणीत एसटी बसमध्ये मोठा वाद; प्रवाशाला मारहाण, बसची काच फोडली…

 

गंगाखेड शहरातील परळी नाका परिसरात घटना..!

 

परभणी/गंगाखेड (Parbhani ST Bus) : बसमध्ये जागा धरण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसन मारहाणीत झाल्याची घटना शुक्रवार २७ डिसेंबर रोजी सायंकाळी अंदाजे ७:२० वाजेच्या सुमारास शहरातील परळी नाका परिसरात घडली. यात बसच्या दरवाजाची काच फोडून एका प्रवाशाला मारहाण करण्यात आली आहे.

 

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, (Parbhani ST Bus) परभणी बस स्थानकावरून लातूरकडे जाणारी एमएच २४ एयु ७७२० क्रमांकाची परभणी लातूर बस शुक्रवार रोजी सायंकाळी अंदाजे ६:२० वाजेच्या सुमारास प्लाटफॉर्म उभी असतांना बसमध्ये जागा धरण्यावरून दोन प्रवाशांत किरकोळ वाद झाला व सायंकाळी सदर बस गंगाखेड शहरातील परळी नाका परिसरात येताच या वादाचे पर्यावसन मारहणीत झाले.

 

बस येण्यापूर्वी परळी नाका परिसरात जमा झालेल्या तरुणांच्या जमावाने बस थांबवून आत प्रवेश करून प्रवाशाला बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला तेंव्हा वाहकाने दरवाजा न उघडल्याने जमावातील काही जणांनी बसच्या दरवाज्यावर दगडफेक करून काच फोडली. अचानक घडलेल्या या (Parbhani ST Bus) घटनेमुळे बसमधील अंदाजे ६५ प्रवाशांत एकच खळबळ उडाली. परळी नाका परिसरात बसवर दगडफेक केल्याची घटना घडल्याची माहिती समजताच पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, सपोनि सिद्धार्थ इंगळे, शिवाजी सिंगणवाड, पोलीस उपनिरीक्षक विशाल बुधोडकर, व्यंकट गंगलवाड, सपोउपनि वैजनाथ आदोडे, जमादार सुंदर शहाणे, संजय साळवे, मारोती माहुरे, दत्ता चव्हाण, अनंत डोंगरे, शंकर गयाळ आदींनी परळी नाका परिसरात धाव घेतली.

 

पोलीस आल्याचे समजताच येथे जमा झालेला जमाव पांगला. या (Parbhani ST Bus) घटनेत वाद झालेल्या दोघांपैकी एक प्रवासी केशव गित्ते रा. परळी किरकोळ जखमी झाले असुन हे प्रवासी सुद्धा एसटी महामंडळाचे कर्मचारी असल्याची माहिती समोर येत आहे. सदर बस पोलीस ठाण्यात आणण्यात आली असुन याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती.

24 News Network

ताज्या बातम्या घडामोडी बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 9022978588. चॅनल ला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा https://www.youtube.com/@Newsnetworklive24 पोर्टल वर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा. https://24newsnetwork.live/

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button