Printing Fake Notes : धक्कादायक, नाशिकमध्ये लॉजवर बनावट नोटा छापण्याचा कारखाना
Printing Fake Notes : धक्कादायक, नाशिकमध्ये लॉजवर बनावट नोटा छापण्याचा कारखाना(प्रतिनिधी मेहमूद अन्सारी)
नाशिक जिल्ह्यात एका लॉजवर बनावट नोटाछापण्याचा कारखाना आढळून आला आहे. आरोपींकडून 20 हजार 700 रुपये जप्त करण्यात आले आहेत. यापूर्वी सुद्धा राज्यात अनेक ठिकाणी बनावट नोटा छापण्याचे प्रकार उघड झाले आहेत.मागच्या काही काळात बनावट नोटा छापण्याचे अनेक प्रकार उघड झालेत. पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेमारीची कारवाई करुन बनावट नोटा छापण्याचे प्रकार उधळून लावले आहेत. आता नाशिकमध्ये असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिक जिल्ह्यातीत दिंडोरीमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दिंडोरीतील लॉजवर हा छापखाना सुरू होताप्रिंटर, कागद आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. 20 हजार 700 रुपयांच्या मुद्देमालासह तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. यापूर्वी आडगावला 2017 मध्ये 2021 ला सुरगाण्यात आणि 2024 ला निवडणूक काळात अंबडला बनावट नोटांच्या संदर्भात कारवाई केली होती. वारंवार बनवेगिरीची प्रकरणे उघड होऊनही उद्योग सुरूच आहेत.