आपला जिल्हा आपली बातमी

Purna Crime: बँकेत चोरी करताना चोरटे CCTV कॅमेरात कैद

Purna Crime: बँकेत चोरी करताना चोरटे CCTV कॅमेरात कैद

 

परभणी/पूर्णा(Parbhani):-   गजानन साबळे एका महिला खातेदाराने बँकेतून ३० हजार रुपये काढत हे पैसे पिशवीत ठेवले असता एका अज्ञात चोरट्याने शिताफीने या महिलेजवळील पिशवी कापून ३० हजार रुपये अलगद काढून घेत लंपास केले. ही घटना सोमवारी (दि.२) दुपारी १२ वाजता शहरातील महावीर नगरमधील बँक ऑफ महाराष्ट्र(Bank of Maharashtra) शाखेत घडली. दरम्यान, हा घडलेला घटनाक्रम बँकेच्या सिसिटीव्हीत (CCTV)कैद झाला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

 

सारांश

चोरट्यांनी पळविले महिलेचे 30हजार रुपये

चोरटे गर्दी बघून आपला हात मारतात

चोरट्यांनी पळविले महिलेचे 30हजार रुपये

याबाबत अधिक माहिती अशी, पूर्णा तालुक्यातील सुकी येथील रहिवासी असलेल्या शोभा राजू रणवीर (वय ३४ वर्ष) या सोमवारी बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत गेल्या होत्या. आपल्या खात्यातून ३० हजार रुपये काढून त्यांनी ते पैसे आपल्याजवळील पिशवीत ठेवले. यादरम्यान एका चोरट्याने पिशवी कापून हे पैसे हातोहात लांबविले. ही बाब निदर्शनास येताच त्यांनी हा घडलेला प्रकार बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखाधिकारी यांना सांगितला. त्यानंतर त्यांनी सीसीटिव्ही फुटेज तपासले असता एका चोरट्याने महिलेची पिशवी कापून पैसे हातोहात लांबविल्याचे दिसून आले. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करा आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक शिंदे यांच्या आदेशानुसार पुढील तपास पोलिस हेड काँस्टेबल नळगीरकर करत आहेत.

 

चोरटे गर्दी बघून आपला हात मारतात

बॅकेत सुरक्षा रक्षक (security guard) तैनात नसतो, बॅकेत नेहमीच गर्दी होत असते त्यामुळे या गर्दीत चोरटे आपला हात मारुन घेतात. यापूर्वी ही अशा घटना वारंवार घडत आलेल्या आहेत. पण बँक प्रशासन सुरक्षेबाबत कोणतीच काळजी घेतांना दिसत नाही. घटना घडून गेल्यावर मात्र थातूरमातूर उपाययोजना केल्या जातात असे सर्व सामान्य नागरिकांत चर्चा आहे. पोलीस प्रशासन व बँक प्रशासनांने या घटनेला गार्भीयाने घेतले पाहिजे.

24 News Network

ताज्या बातम्या घडामोडी बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 9022978588. चॅनल ला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा https://www.youtube.com/@Newsnetworklive24 पोर्टल वर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा. https://24newsnetwork.live/

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button