स्वर्गीय अश्रू (दादा) जाधव यांच्या तृतीय पुण्यस्मरणार्थ करमाळा कुटीर रुग्णालय व एकलव्य अनाथ आश्रम येथे फळे वाटप
स्वर्गीय अश्रू (दादा) जाधव यांच्या तृतीय पुण्यस्मरणार्थ करमाळा कुटीर रुग्णालय व एकलव्य अनाथ आश्रम येथे फळे वाटप
प्रतिनिधी: तुषार जाधव
करमाळा: दि. २५/ स्वर्गीय अश्रू (दादा) जाधव यांच्या तृतीय पुण्यस्मरणार्थ दि. 25/ 12/ 20२4 रोजी करमाळा कुटीर रुग्णालय व एकलव्य अनाथ आश्रम येथे जाधव परिवाराकडून फळे वाटप करण्यात आले. दरवर्षी आम्ही आमच्या आजोबाच्या स्मरणार्थ विविध सामाजिक कार्यक्रम करत असतो त्या पाश्चभुमिवर यावर्षी आम्ही विविध कार्यक्रम न घेता काहीतरी वेगळं करायचे म्हणून कुटीर रुग्णालय करमाळा येथील रुग्णांना तसेच एकलव्य अनाथ आश्रम येथील चिमुकल्यांना फळे वाटण्याचे ठरविले व ते पूर्ण केले असे स्वर्गीय अश्रू (दादा ) जाधव यांचे नातू आदित्य जाधव व तुषार जाधव यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की स्व. अश्रू जाधव यांच्या नावाने करमाळा तालुक्यातील गरजूंसाठी अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा मानस असल्याचे युवासेना शहर उपाध्यक्ष आदित्य जाधव यांनी यावेळी नमूद केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बंटी भोसले, बंटी पवार, अशोक शिंदे, आनंद बंडगर व सर्व सहकारी यांनी परिश्रम घेतले.