तूरीच्या शेतात केली गांजाची लागवड
तूरीच्या शेतात केली गांजाची लागवड
Parbhani crime: तूरीच्या शेतात केली गांजाची लागवड
परभणी/पालम (Parbhani):- तालुक्यातील मौजे पेठशिवणी शिवारातील गट क्रमांक १४०. १२ शेतीमध्ये कपाशी व तुरीच्या पिकामध्ये गांजाची लागवड केल्याचा प्रकार गुरुवार २६ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास उघडकीस आला. पालम पोलिसांनी छापा मारुन २ लाख ६१५ रुपये किंमतीची २८ गांजाची (Marijuana) झाडे जप्त करण्यात आली.
पेठशिवणी शिवारातून दोन लाखाची झाडे जप्त
पालम तालुक्यातील पेठशिवणी शिवारात एका शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती पालम पोलिसांना मिळाली. पोनि. सुरेश थोरात यांनी तातडीने पोउपनि. पी आर लोखंडे, हवालदार बळवंते, एस.पी कोलमवाड, बाबू सिंगनवाड, कल्याण साठे, नायब तहसीलदार पवळे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. शेतकरी माधव हंगरगे यांच्या गट क्रमांक १४०. १२ मध्ये असलेल्या पिकाची पाहणी केली. कापूस, तूरीची लागवड केलेल्या शेतात गांजाची २८ झाडे आढळून आली. या झाडांची किंमत २ लाख ६१५ रुपये किंमतीचा मुद्देमाल आढळून आला. पालम पोलिसांनी सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या प्रकरणी पोउपनि. प्रकाश लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एन.डी.पी.एस. अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोनि. सुरेश थोरात करत आहेत.