वाशिम : अवैध गुटखा विक्रीविरुद्ध धडक कारवाई १४ लाखांचा मुद्देमाल जप्त
वाशिम : अवैध व्यवसाय विरुद्ध नागरिकांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन वाशिम येथील उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांनी केले होते. त्यानुसार आज दि. 26/12/2024 रोजी गुप्त शिरपूर येथे ओमकार कॉलनी ओमकार मेडीकल जवळ एका वाहनात (क्र. एमएच 37 टी 2488) अवैध गुटखा असल्याबाबत खात्रीलायक माहिती बातमीदाराकडून मिळाली होती.
या माहितीवरुन अग्रवाल यांनी पथकासह सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला. या वाहनात 17 नग प्लास्टीक गोण्यामध्ये गुटखा आढळून आला. याची किंमत 6,76,620/-रुपयेचा असून वाहनाची किंमत 8,00,000/- रुपयेची असा एकूण 14,76,620/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व अनिल दशरथ वाघ यांचेविरुध्द पोस्टे शिरपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती लता फड यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि दिनेश शिरेकार, पोहेकाँ हरिभाऊ कालापाड, पोकाँ स्वप्नील शेळके, पोकाँ शंकर वाघमारे चापोकाँ कोकाटे यांनी केली आहे