आपला जिल्हा आपली बातमी

व्हि पी के उद्योग समूहाच्या वतीने बावीस प्रशिक्षणार्थी व्हि एस आय पुणे येथे ऊस शेती प्रशिक्षणास रवाना.

भोकर व बिलोली या तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी आपल्या भागातील शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम झाला पाहिजे या हेतूने उद्योग समूहाच्या वतीने सातत्याने प्रयत्न.

व्हि पी के उद्योग समूहाच्या वतीने बावीस प्रशिक्षणार्थी व्हि एस आय पुणे येथे ऊस शेती प्रशिक्षणास रवाना

उमरी- प्रतिनिधी किशोर कवडीकर

नायगाव मतदार संघातील उमरी, धर्माबाद, नायगाव व त्यासोबत भोकर व बिलोली या तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी आपल्या भागातील शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम झाला पाहिजे या हेतूने उद्योग समूहाच्या वतीने सातत्याने प्रयत्न सुरू असतात.

त्यासाठी उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष मा.मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांच्या अभ्यासपूर्ण दृष्टीच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देऊन त्यांच्या उत्पादनात वाढ कशी करता येईल यासाठी अहोरात्र परिश्रम करून प्रयत्न साध्य करीत आहेत.

ऊस शेती करत असताना शेतकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीचा त्याग करून आधुनिक ऊस शेतीची कास धरावी व उत्पादन वाढीसाठी प्रयत्नशील व्हावे यासाठी शेतकऱ्यांना वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथे होत असलेल्या ऊस शेती ज्ञानयाग प्रशिक्षणास वर्षातून दोन वेळा वेगवेगळ्या शेतकऱ्यांना पाठवण्याचे नियोजन माघील पाच वर्षापासून चालू आहे.

त्या अनुषंगाने दि २३/१२/२०२४ रोजी एकूण २२ प्रशिक्षणार्थी यांना आधुनिक ऊस उत्पादन घेण्याच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले आहे.

माघील चार वर्षापासून प्रशिक्षण घेतलेल्या शेतकऱ्यास याचा फायदा होऊन अनेक शेतकऱ्यांनी आपल्या ऊस शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अमुलाग्र बदल केल्याचे दिसून येत आहे.

केवळ ऊस शेतीच नाही तर त्या सोबत शेती पूरक जोड व्यवसाय करण्या साठीच्य अभ्यास दौऱ्याचे आयोजन व्हि पी के समुहाच्या माध्यमातून करण्यात येतात यात शेतीपूरक जोड व्यवसाय असलेल्या दुग्ध व्यवसायासाठी चे अभ्यास दौरे शेतकऱ्यांसाठी पश्चिम महाराष्ट्रात काढले जातात त्यासाठी देखील शेतकऱ्यांचा उस्पूर्थ प्रतिसाद मिळतो व दूध उत्पादक शेतऱ्यांसाठी *साईकृपा दूध डेअरी सिंधी* च्या माध्यमातून गावोगावी दूध संकलन केंद्र स्थापन करून शेतकऱ्यांना दूध विक्री साठी गावातच सोय उपलब्ध करून दिली आहे व डेअरी च्या माध्यमातून दर दहा दिवसाला दुधाचा ताजा पैसा शेतकऱ्याच्या खिश्यात घालण्याचे काम व्हि पी के समूहाच्या माध्यमातून केले जाते.

 

जनावरांचे संगोपन करून दुधाच्या माध्यमातून ताजा पैसा शेतकऱ्यांना तर मिळतोच परंतु जनावरांचे मल-मूत्र हे शेत जमिनीचे शेंद्रियकर्ब वाढविण्यासाठी अत्यंत फायदेशीर असल्या मुळे त्या शेनखताचा वापर शेतीत करून जमीन सुपीक व कसदार बनवण्याचे कार्य शेतकऱ्याकडून होत आहे व अजून अधिक प्रमाणात हे कार्य व्हावे या साठी सर्व शेतकर्यांनी याचे महत्त्व ओळखून प्रयत्न करणे गरजेचे आहे.

मतदार संघात उद्योग समूहातील तीन ऊस कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादकांना ऊसाचा शाष्वत पैसा तर मिळतोच आहे परंतु त्यासोबत जवळपास ४५०० बेरोजगारांना रोजगार निर्मिती या माध्यमातून उद्योग समूहाने केली आहे.

फक्त शेतीच नाही तर विविध व्यवसाय व छोटे उद्योग उभारू इच्छिणाऱ्या होतकरू तरुणांना व्हि पी के पथसंस्थेच्या माध्यमातून अल्पावधीत कर्ज पुरवठा करून हजारो तरुणांना स्वतःच्या पायावर सक्षम पने उभे करण्याचे काम पथसंस्थेच्या विस शाखांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात केले जात आहे.

आपल्या मतदार संघातील शेतकरी, शेतमजूर, कर्मचारी यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळून येणारी पिढी शैक्षणिकदृष्ट्या सक्षम व्हावी या हेतूने ढोलउमरी,उमरी व वाघलवाडा कारखाना येथे शैक्षणिक संस्थांची उभारणी करून विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्याचे धडे गिरवण्याचे काम उद्योग समूहा मार्फत केल्या जात आहेत.

उद्योग समूहा मार्फत केवळ नफा न पाहता आपण समाजाचे काही देणे लागतो या समर्पक भावनेणे उद्योग समूहाच्या माध्यमातून सामूहिक विवाह सोहळा, आरोग्य शिबिरे,आपत्तीग्रस्तांना तातडीची मदत, वृक्षारोपण व जलसंधारणाची कामे व या सारखे अनेक सामाजिक उपक्रम उद्योग समूहाच्या वतीने मतदार संघात राबवले जातात.

नायगाव मतदार संघासह नांदेड जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी कामगार व सर्व सामान्य जनतेचा विकास करण्यासाठी *मारोतराव पाटील कवळे गुरुजी* यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने उद्योग समूहाची रचना करून सर्वसामान्य शेतकरी व बेरोजगार तरुण यांना स्वावलंबी व सक्षम करण्यासाठी करत असलेल्या परिश्रमाची जाणीव सर्व जनतेस आहे त्याचे प्रत्यय व शेतकऱ्यांमध्ये होत असलेले आधुनिक बदल यातून दिसत आहेत. तरी मतदार संघातील जनतेच्या विकासासाठी उभारण्यात आलेल्या या उद्योग समूहातील वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेऊन सकारात्मक दृष्ट्या विचार करून सर्व जनतेने विकासाची कास धरून आपली प्रगती साधावी हीच विनंती मतदार संघातील सर्व जनतेस व्ही पी के समूहाच्या वतीने करण्यात येत आहे.

24 News Network

ताज्या बातम्या घडामोडी बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 9022978588. चॅनल ला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा https://www.youtube.com/@Newsnetworklive24 पोर्टल वर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा. https://24newsnetwork.live/

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button