आपला जिल्हा आपली बातमीरिसोड तालुकावाशिम जिल्हा

Washim Crime News: एका रुग्णालयात अवैधरित्या गर्भपात होत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांना मिळाली होती.

यानुसार, त्या रुग्णालयावर धाड टाकण्यात आली. तेव्हा तिथे एका महिलेवर गर्भपाताची प्रक्रिया सुरु होती.

Breaking news – Washim Crime News: एका रुग्णालयात अवैधरित्या गर्भपात होत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांना मिळाली होती. यानुसार, त्या रुग्णालयावर धाड टाकण्यात आली. तेव्हा तिथे एका महिलेवर गर्भपाताची प्रक्रिया सुरु होती.

वाशिम: वाशिमच्या रिसोडमध्ये शिव मूळव्याध आणि प्रसूतीगृह या दवाखान्यात अवैधरित्या गर्भपात होत असल्याची माहिती वाशिमच्या वैद्यकीय पथकाला मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर वाशिमच्या वैद्यकीय पथकाने रात्री अचानक या रुग्णालयात धाड टाकत कारवाई केली. या प्रकरणी अमोल भोपाळे या डॉक्टरवर रिसोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना रात्री उशिरा अटक केल्याची माहिती आहे.सोनोग्राफीत मुलीचा गर्भ असल्याचं निदान, महिला गर्भपातासाठी रुग्णालयात भरती असल्याची गुप्त माहिती रिसोड तालुक्यातील एका गर्भवती महिलेनं बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील एका सोनोग्राफी केंद्रात सोनोग्राफी केली. तेव्हा मुलीचा गर्भ असल्याचं लक्षात आल्यावर ती महिला गर्भपात करण्यासाठी रिसोड येथील अमोल भोपाळे यांच्या दवाखान्यात भरती झाली आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक प्रशांत पवार यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार, वैद्यकीय पथकाने शिव मूळव्याध आणि प्रसूती गृह या दवाखान्यावर रात्री अचानक धाड टाकत ही कारवाई केली आहे.चौकशीतून मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

 

हे गर्भपात केंद्र मागील अनेक वर्षांपासून सुरु असल्याचा संशय असून चौकशीनंतर मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. यावेळी वाशिम सामान्य रुग्णालयाच्या राधा नरवालिया, ओम राऊत आणि इतर चमू सामील होती.नेमकं काय घडलं?

रिसोड येथील अमोल भोपाळे या डॉक्टरकडे एक महिला गर्भपात करण्यासाठी आली असता आमच्या पथकाने त्या शिव मूळव्याध आणि प्रसूती गृह या दवाखान्यावर धाड टाकली. तेव्हा तिथे एका महिलेचा गर्भपात सुरू असल्याचं आढळून आलं. तिथे गर्भपाताचं साहित्य आणि काही औषधी देखील आढळून आल्या आहेत. त्या सर्व गोष्टी आम्ही जप्त केल्या आहेत. यासाठी जे जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांनी दिली. सध्या या प्रकरणात चौकशी सुरु असून मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.

24 News Network

ताज्या बातम्या घडामोडी बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 9022978588. चॅनल ला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा https://www.youtube.com/@Newsnetworklive24 पोर्टल वर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा. https://24newsnetwork.live/

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button