भारत मुक्ती मोर्चाकडून भीमा कोरेगाव लढाईतील 500 बहुजन शूरवीरांना मानवंदना, विजयी दिनानिमित्त उसळला लाखोंचा जनसागर
भारत मुक्ती मोर्चाकडून भीमा कोरेगाव लढाईतील 500 बहुजन शूरवीरांना मानवंदना, विजयी दिनानिमित्त उसळला लाखोंचा जनसागर
पुणे: प्रतिनिधी गजानन साबळे
सन 1818 मध्ये कोरेगाव भिमा येथे इंग्रजांच्या सेनेतील शूरविर बहुजन आणि पेशवा सैनिकांमध्ये झालेल्या लढाईत 500 शूरविर बहुजन सैनिकांनी 28 हजार पेशव्यांना कचाकच कापून काढले. त्यानिमित्त भीमा कोरेगांव येथे इंग्रजांनी 500 बहुजन सैनिकांच्या स्मरणार्थ विजयस्तंभ उभारला. या विजयी स्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी एक जानेवारी रोजी देश विदेशातून लाखों लोक येतात. यावर्षी देखील विजयी दिनानिमित्त भीमा कोरेगांवमध्ये लाखोंच्या संख्येने जनसागर उसळला. या दरम्यान बुधवारी एक जानेवारी रोजी भारत मुक्ती मोर्चा आणि छत्रपती क्रांती सेनेतर्फे भीमा कोरेगाव लढाईतील 500 बहुजन शूरवीरांना मानवंदना देण्यात आली.
यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम, नेपाळमधील आंबेडकरी संघटनेचे मनोज जगेडी, राजस्थान येथील क्षत्रिय मूलनिवासी मोर्चाचे पदाधिकारी रविंद्र सिंह बिदावत, रविंद्र सिंह गुडा, सुभाष कोलपे, डॉ. मगण ससाने, कार्यकारी अध्यक्ष बामसेफ आणि राष्ट्रीय अध्यक्ष (इंडियन मेडिकल प्रोफेशनल असोशिएशन नवी दिल्ली), व्हि.व्हि जाधव (राष्ट्रीय उपाध्यक्ष बामसेफ), गोरखनाथ वेताळ (राष्ट्रीय प्रचारक राष्ट्रीय गुरू रविदास क्रांती मोर्चा), अॅड. सुनिल डोंगरदीवे, (राष्ट्रीय प्रभारी राष्ट्रीय क्रिश्चन मोर्चा), डॉ. अनिल माने (राष्ट्रीय अध्यक्ष युवा बीएमपी प्रकोष्ठ), घुगे शास्त्री महाराज (प्रदेश अध्यक्ष सत्याशोधक मूलनिवासी वारकरी संघ), योगी सुरजनाथ (राष्ट्रीय प्रभारी नाथ सिद्ध बुद्ध संघ) उपस्थित होते.
माहित असावे कि सन 1818 मध्ये इंग्रजांच्या सेनेत असलेले शूरवीर बहुजन योध्ये आणि पेशवा सैनिकांमध्ये युद्ध झाले. या युद्धात 500 शूरविर बहुजन सैनिकांनी 28000 पेशवा सैनिकांचा कचाकच कापून काढले. यासाठी इंग्रजांनी या शूरविर बहुजन सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी 75 फूट उंच विजयस्तंभ उभारला आहे. त्यावर 20 शहीद, 3 जखमी बहुजन सैनिकांची नावे कोरलेली आहे. शूरविर बहुजन सैनिकांच्या सन्मानार्थ येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारीला देशभरातून अनुयायी लाखोंच्या संख्येने येत असतात.
इंग्रजांच्या सैनिकांत ‘बॉम्बे नेटिव लाइट इन्फेंट्री तुकडी’चे सुमारे 500 बहुजन समाजातील सैनिक होते. या सैनिकांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टांटन करीत होते.
पेशव्यांच्या बाजूने 28 हजार सैनिक होते. ज्यांचे नेतृत्व सेनापती पेशवे बाजीराव दुसरे करीत होते.
पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते. महार, मांग तसेच इतर अस्पृश्यांना अत्यंत हीन वागणूक दिली जात होती. याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मासाठी ब्रिटिशांच्या बाजूने पेशवे विरूद्ध लढले. यात 28 हजार सैनिकांचा फक्त 500 बहुजन सौनिकांनी पराभवर केला.
कोरेगाव भिमाच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी शूरवीर बहुजन सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी 75 फूट उंच विजयस्तंभ उभारला आहे. त्यावर 20 शहीद, 3 जखमी बहुजन सैनिकांची नावे कोरलेली आहे. शूरविर बहुजन सैनिकांच्या सन्मानार्थ येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारीला देशभरातून अनुयायी लाखोंच्या संख्येने येत असतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1 जानेवारी 1927 रोजी या क्रांतीस्तंभाला आपल्या सहकाऱ्यांसह भेट देऊन मानवंदना दिली होती. त्या वर्षीचा स्मृतिदिन साजरा केला होता. आंबेडकरांच्या या मानवंदनेनंतर दरवर्षी 1 जानेवारीला मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी कोरेगावातील या विजयस्तंभाला भेट देत आदरांजली अर्पण करतात. दरवर्षी मोठ्या उत्साहाने लाखोंच्या संख्यने अनुयायी या विजस्थंभाला अभिवादन करण्यासाठी येतात.
पेशव्यांच्या राजवटीतील महारांना रस्त्यावर थुंकण्याचीही परवानगी नव्हती. म्हणूनच त्यांच्या गळ्यात मटके लटकवले जात होते. रस्त्यातून चालतांना पावलांचे ठसे मिटावेत म्हणून त्यांच्या कंबराला झाडू बांधली जायची. ब्राह्मण दिसल्यावर महारांची सावलीही ब्राह्मणावर पडू नये म्हणून त्यांना त्याच्यापासून काही अंतरावर जमिनीवर तोंड करून झोपावे लागत होते. महार-मांगांची सावली ब्राह्मणांना सहन होत नव्हती. याचा वचपा काढण्यासाठी त्यांनी इंग्रजांच्या सैन्यात प्रवेश घेतला. आणि काही बहुजन सैनिकांसह त्यांनी पेशव्यांच्या 28 हजार सैनिकांना पराभवाची धूळ चारली.