जिल्ह्यातील ग्रामपंचायतीला पडला सिसिटीव्ही चा विसर,गाव पातळीवरील सुरक्षा वाऱ्यावर
पोलीस प्रशासनाच्या पत्राला केराची टोपली
जिल्ह्यातील ग्रामपंचायतीला पडला सिसिटीव्ही चा विसर,गाव पातळीवरील सुरक्षा वाऱ्यावर
पोलीस प्रशासनाच्या पत्राला केराची टोपली
परभणी : गाव पातळीवर नागरीकांसह विविध महापुरुषांचे पुतळे, शासकीय कार्यालये, बाजारपेठ, दुकाने आदि ठिकाणी सुरक्षीतता रहावी यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना स्थानीक पोलीस प्रशासनाच्या मार्फत लेखी स्वरुपाची सुचना देवून गावात सार्वजनीक ठिकाणी सिसिटीव्ही कॅमेरे बसविण्यास सांगीतले आहे. परंतु अनेक ग्रामपंचायतीनी या पोलीस प्रशासनाच्या लेखी सुचनेला केराची टोपली दाखवत सिसिटीव्ही कॅमेरे बसविण्यास अनास्था दाखविली आहे. यामुळे गावपातळीवरील सुरक्षीतता मात्र वाऱ्यावरच असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये विविध महापुरुषांचे पुतळे विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडक यांचे पुतळे गावातील मुख्य ठिकाणी बसविण्यात आले आहेत. तसेच मंदिर, मस्जीत या धार्मिक स्थळा बरोबरच विविध शासकीय कार्यालये, खाजगी दुकाने, बाजारपेठ, शाळा, ग्रामपंचायत कार्यालय आहेत. गावामध्ये अनेक वेळा अनोळखी व्यक्ती प्रवेश करुन चोरी सारख्या घटना घडत आहेत. तसेच धार्मिक स्थळांची व महापुषांच्या पुतळयांची विटंबणा होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा घटनांमुळे सामाजीक तेढ निर्माण होवून अशांतता निर्माण होण्याचे प्रकार देखील मोठ्या प्रमाणात घडत आहेत. नुकतीच परभणी शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्या समोरील संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण राज्यासह देशात संतापाची लाट उसळली होती. याच पार्श्वभुमीवर परभणी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने भविष्यात गाव पातळीवर देखील अशा घटनांची पुर्णरावृत्ती होवू नये म्हणुन पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतुन तरतुदीची गरज
गाव पातळीवर सिसिटीव्ही बसविण्यासाठी शासनाकडून देण्यात येणाऱ्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतुन तरतुद करून गाव सिसिटीव्ही कॅमेऱ्याच्या नजर कैदेत ठेवण्यासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
पोलीस प्रशासनाच्या वतीने ग्रामीण भागात देखील सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याच्या लेखी सुचना दिल्या होत्या. या सुचनांचे पालन करत जिल्ह्यातील काही मोजक्याच ग्रामपंचायत कार्यालयाने सार्वजनीक ठिकाणी सिसिटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. परंतु बहुतांश ग्रामपंचायतीनारे गाववण्यातळीवर प्रकारे विसर पडला आहे. त्यामुळे गावातील नागरीकांसह सार्वजनीक ठिकाणची सुरक्षीतता वाऱ्यावर असल्याचे दिसुन येत आहे.