कोमल करण पाटोळे महाराष्ट्राची महागायिका जीवन प्रवास.
झाडाला गोड फळ लागली की आपलीच माणसं दगड मारायला सुरवात करतात, तसाच प्रकार कोमलताई पाटोळे यांच्या बाबतीत झाला आहे.
कोमल करण पाटोळे महाराष्ट्राची महागायिका जीवन प्रवास
झाडाला गोड फळ लागली की आपलीच माणसं दगड मारायला सुरवात करतात, तसाच प्रकार कोमलताई पाटोळे यांच्या बाबतीत झाला आहे
कोमल पाटोळे यांचं नाव आज महाराष्ट्राच्या नकाशावर विराजमान झाले आहे, शिक्षणाचा गंध नसलेली पिढीजात कलेचा वारसा असलेली गायिका आज विविध गायनाच्या माध्यमातून राज्यात प्रसिद्ध आहेत, कलाकाराला कोणती ही जात नसते, धर्म नसतो,कोणताही कलाकार त्याच्यात असलेली कला जनतेच्या आग्रहानुसार कुठं ही सादर करू शकतो,
जातिवंत कलाकार हा गर्विष्ट नसतो,
कलाकार हा कलाकारच असतो तो गरीब किंवा श्रीमंत हा भेद नसतो, परंतु दुर्दैवाने अनावधानाने गायलेल्या गाण्याचा पॉईंट घेत काही कलाकार मंडळींनी त्यांना ताणून धरण्याचा प्रयत्न केला. तो योग्य वाटला नाही कारण कोमल ताईंनी गायलेलं गाणं हे कुणाच्या भावना दुखवल्या जातील असा अजिबात हेतू नव्हता..
सध्या त्यांच्या कार्यक्रमाला मागणी जोर धरत आहे. हा काही कलाकार मंडळीना हेवा वाटत असावा, कारण तमाशा वरून थेट जागरण गोंधळ कार्यक्रम कसा काय गाजवत आहेत असा प्रश्न पारंपरिक जागरण गोंधळ करणाऱ्या कलाकार मंडळीना वाटणे साहजिकच आहे,
परंतु कोमल ताई पाटोळे ह्या स्वतः हुन कुणाकडे मला तुमच्या कार्यक्रमांची सुपारी द्या म्हणून जात नाहीत, लोक त्यांच्या कडे येतात आणि जागरण गोंधळाची सुपारी देतात,
शेवटी कला आहे, व्यवसाय आहे. मागणी तसा पुरवठा करायला पाहिजे.. आता पारंपरिक जागरण गोंधळ राहिलेला नाही, लोकांना ऑर्केस्ट्रा सेम कार्यक्रम पाहिजेत, त्या मुळे पारंपरिक कलेला महत्व राहिलेले नाही, आणि कोमल ताई भावगीत ते लावणी पर्यंत गाण्याचा प्रवास करतात ही परमेश्वराने त्यांना दिलेली देणगी आहे,
तरी ही ज्यांनी विरोध दर्शवला त्यांच्या साठी त्यांनी देवीच्या चरणी माफी मागितली आहे यातूनच त्या महान विचारवंत देखील आहेत हे दाखवून दिले आहे…
या मुळे आणखीनच कोमल ताई पाटोळे या जास्त प्रसिद्ध झाल्या आहेत, त्यांना पुढील कार्यास भरभरून शुभेच्छा..
डॉ. संजय लोखंडे राष्ट्रीय अध्यक्ष
राष्ट्रीय लोकशाही लढा सामाजिक संघटना