नागरे, राऊत यांचा शिर्डीत राष्ट्रवादीत प्रवेश,परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढणार.
प्रतिनीधी गजानन साबळे
नागरे, राऊत यांचा शिर्डीत राष्ट्रवादीत प्रवेश
परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढणार
जिंतूर – सेलुचे राजकीय समीकरण बदलले
परभणी/सेलू (Parbhani NCP) : विधानसभेच्या निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार आल्याने येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिंतूरविधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे सुरेश नागरे, नाना राऊत, संजय साडेगावकर, अविनाश काळे व इतर अनेक दिग्गजांनी शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत (Parbhani NCP) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढणार
जिंतूर – सेलुचे राजकीय समीकरण बदलले
शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Parbhani NCP) शिबिर चालू आहे या शिबिरात जिंतूर- सेलू विधानसभा मतदारसंघातील अनेक आजी-माजी पदाधिकार्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस पक्षाचा मोठा गट शनिवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीला बळ मिळालेले आहे तर काँग्रेसची ताकद या मतदारसंघात कमी झाली आहे.
प्रवेशामध्ये बाळासाहेब घुगे, लिंबाजीराव पुंजारे, अॅड. सुनील बुधवंत, प्रकाशराव देशमुख, राजेंद्र नागरे, लक्ष्मणराव बुधवंत, गणेशराव मुंढे, केशवराव बुधवंत, रामजी घुगे यांचा समावेश असून इतर अशा ७३ जणांनी जाहीर प्रवेश घेतला. यापूर्वी सोहळ्याला खा. प्रफुल पटेल खा. सुनील तटकरे आ. राजेश विटेकर आ. चिखलीकर, आ. राजेश नवघरे व इतर पदाधिकार्यांची उपस्थिती होती.