आपला जिल्हा आपली बातमी

नवीन वर्षाच्या स्वागतालाच गालबोट, वाहनं जाळली, दोन गटांत धुमश्चक्री

मंत्र्यांच्या वाहनाचा धक्का लागल्याचे निमित्त, जळगावच्या पाळधीत घडलं तरी काय

नवीन वर्षाच्या स्वागतालाच गालबोट, वाहनं जाळली, दोन गटांत धुमश्चक्री, मंत्र्यांच्या वाहनाचा धक्का लागल्याचे निमित्त, जळगावच्या पाळधीत घडलं तरी काय

 

जळगाव जिल्ह्यातील पाळधीत रात्री मोठा वाद पेटला. नवीन वर्षाच्या स्वागतालाच गालबोट लागलं. वाहनं जाळली, दोन गटांत धुमश्चक्री उडाली. मंत्र्यांच्या वाहनाचा धक्का लागल्याचे निमित्ताने हा वाद उफाळला.जळगाव जिल्ह्यातील पाळधी (Jalgaon Paladhi) या गावात नवीन वर्षाच्या स्वागतालाच गालबोट लागले. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाहनाचा धक्का लागल्याचे निमित्त आणि दोन गट समोरासमोर आले. या वाहनात मंत्री नव्हते. तर त्यांची पत्नी असल्याची माहिती समोर येत आहे. पाळधी मध्ये दोन गटात वाद झाल्यानंतर समाज कंटकानी रात्री साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास गॅरेज समोर उभी तीन ते चार चारचाकी वाहने पेटवून दिली.पाळधी गावात तैनात पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. आता कशी आहे परिस्थिती?

नेमकं घडलं काय?

 

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाहनातून त्यांची पत्नी जात असताना या वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून पाळधी गावात दोन गटात वाद झाला. रात्री एक वाजेच्या सुमारास वाहने पेटवून दिले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर गॅरेजमधील कामगार घटनास्थळी पोहोचले, त्यांच्याकडून वाहने विझविण्याचे प्रयत्न करण्यात आले. वाहने पेटवून दिल्याची घटनेची माहिती पोलीस कर्मचार्‍यांना सुद्धा उशिराने मिळाली. या घटनेमध्ये समाजकंटकांनी दोन ते तीन दुकाने पेटवून दिली तर तर काही दुकानांची तोडफोड करत नुकसान केले. अग्निशमन बंब घटनास्थळी पोहचेपर्यंत पेटविण्यात आलेली सर्व वाहने आणि दुकान जळून खाक झाली होती. पेटलेली दुकानांचे आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न प्रयत्न कामगार तसे अग्निशमन दलाच्या जवानांकडून पहाटेपर्यंत सुरू होते.पाळधीत संचारबंदी

 

जळगावच्या पाळधी मध्ये पूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. पोलिसांच्या वाहनातून लाऊड स्पीकरच्या माध्यमातून या ठिकाणच्या ग्रामस्थांना संचार बंदीबाबत सूचना देण्यात आली होती. पाळधी गावांमध्ये पहाटे सहा वाजेपर्यंत कलम 144 अन्वये संचारबंदी लागू करण्यात आले होते. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पाळधी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी सात ते आठ संशयितांना अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक अधिकाऱ्यांचा ताफा या ठिकाणी रात्रभरापासून ठाण मांडून होता. सद्यस्थितीत पाळधी गावामध्ये पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.

 

अंतर्गत भांडण झाल्याने त्यावरून दोन गटात वाद झाला. काही संशयतांना ताब्यात घेतले असून 20 ते 25 अज्ञात व्यक्तींविरुद्ध धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी बोलताना दिली आहे

24 News Network

ताज्या बातम्या घडामोडी बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 9022978588. चॅनल ला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा https://www.youtube.com/@Newsnetworklive24 पोर्टल वर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा. https://24newsnetwork.live/

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button