पैसे मागाल तर खबरदार; आ.डॉ. गुट्टे यांचा प्रशासनाला इशारा जिल्ह्यातील नागरीकांनी करावा संपर्क, केले आवाहन
प्रतिनीधी गजानन साबळे परभणी
पैसे मागाल तर खबरदार; आ.डॉ. गुट्टे यांचा प्रशासनाला इशारा जिल्ह्यातील नागरीकांनी करावा संपर्क, केले आवाहन
परभणी :जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका शिक्षण विभाग,
भूमिअभिलेख, महावितरण, बँक तसेच इतर शासकीय कार्यालयात विविध शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरीकांना पैशाची मागणी केली तर खबरदार अशा इशारा आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी दिला आहे. याबाबत त्यांची एक पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे. कोणी पैसे मागीतले तर माझ्याशी
संपर्क करा, असे आवाहन आ. डॉ. गुट्टे यांनी केले आहे. गंगाखेड विधानसभा मतदार संघातील नागरीकांना प्रशासकीय कामात अडवणूक होत असल्याची तक्रारी वाढत आहे. त्या अनुषंगाने भ्रष्टाचारमुक्त स्वच्छ प्रशासकीय कार्यपध्दती व्हावी, यासाठी आ. डॉ. गुट्टे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत जनतेला आवाहन केले आहे. प्रशासकीय कामे करतांना काही अधिकारी हे दलालांचा वापर करून पैसे उकळतात. भ्रष्टाचार करण्याची पध्दत प्रशासकीय पातळीवर बदलली असल्यामुळे दलालांचा देखील बंदोबस्त करावा, असे आ.डॉ. गुट्टे यांनी सांगीतले. काही दिवसांपूर्वी
त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत सुचना दिल्या होत्या. आता समाज माध्यमांवर पोस्ट टाकल्याने भ्रष्टाचारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना नक्कीच चपराक बसेल.