Parbhani: परभणीच्या पाथरी कृउबास सभापतीपदी अनिल नखाते कायम
Parbhani: परभणीच्या पाथरी कृउबास सभापतीपदी अनिल नखाते कायम
परभणी/पाथरी (Parbhani):- कृऊबास सभापती अनिल नखाते यांचे संचालक पद रद्द करण्याचा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था परभणी यांनी काढलेला आदेश विभागीय सहनिबंधक शरद जरे यांनी रद्द केला आहे. त्यामुळे अनिल नखाते याची सभापतीपदी(Chairmanship) वर्णी कायम राहणार आहे.
विभागीय सह निबंधकांचा आदेश
सुनावणीत हस्तक्षेपक म्हणून संचालक अमोल बांगड व उपसभापती शाम धर्मे यांनी दिला अर्ज
विभागीय सह निबंधकांचा आदेश
पाथरी कृऊबास संचालक एकनाथ घांडगे व ईतर ४ जणांच्या जुन्या तक्रारीनुसार अनिल नखाते यांना महाराष्ट्र बाजार समितीच्या नियम २०१७ मधील नियम १० (१) नुसार संचालकपदी १० आँक्टोबर २०२४ रोजी अपात्र घोषित केले होते . या निर्णयाविरुद्ध अनिल नखाते यांनी १६ आँक्टोबर रोजी विभागीय सहनिबंधक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे अपील दाखल केले होते. यामध्ये १८ आँक्टोबर रोजीच्या सुनावणीत हस्तक्षेपक म्हणून संचालक अमोल बांगड व उपसभापती शाम धर्मे यांनी अर्ज दिला. याप्रकरणात प्रतिवादीची संख्या १० अशी झाली होती. या प्रकरणात ५ वेळा सुनावणी घेण्यात आली. यामध्ये अनिल नखाते यांच्या वतीने ऍड.जि.व्ही.सुकाळे यांनी युक्तीवादात केला तर प्रतिवादी यांचे वतीने ऍड.एम.आर.चौधरी, ऍड.के.जे. सुर्यवंशी, ऍड.मनिष त्रिपाठी यांनी युक्तिवाद केला.
सुनावणीत हस्तक्षेपक म्हणून संचालक अमोल बांगड व उपसभापती शाम धर्मे यांनी दिला अर्ज
दोन्ही बाजुचा युक्तिवादानंतर विभागीय सहनिबंधक शरद जरे यांनी ३१ डिसेंबर रोजी अनिल नखाते यांना संचालक म्हणून अपात्र ठरविणारा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था परभणी यांचा १४ ऑक्टोबर २०२४ चा आदेश रद्द केला आहे. तसेच हे प्रकरण फेरनिर्णयार्थ प्रतिप्रेषीत करण्यात आले असल्याचे आदेशीत केले आहे. या निर्णयामुळे अनिल नखाते यांचे सभापतीपद कायम राहीले आहे.