Parbhani: शहीद सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात पोलीसांवर कारवाई करा
Parbhani: शहीद सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात पोलीसांवर कारवाई करा ..!
परभणी (Parbhani):- शहरातील संविधान प्रतिकृतीची विटंबना प्रकरणात शहिद सोमनाथ सुर्यवंशी व विजय वाकोडे कुटुंबाला न्याय मिळालेला नाही. तसेच निरपराध तरुण, महिलांवर दाखल केलेले गुन्हे (Crime)वापस घेण्यात आलेले नाहीत. सुर्यवंशी मृत्यू प्रकरण व अमानुष मारहाण (Beating)प्रकरणात अधिकारी व पोलीसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन अनु.जाती जमातीचे प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांनी पोलीस अधीक्षक मार्फत मुख्यमंत्री यांना दिले आहे.
सारांश
मुख्यमंत्र्यांकडे डॉ.सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांची मागणी
शहीद सुर्यवंशी यांचे स्मारक बनविण्याची
मारहाण करणार्या पोलीसांवर तातडीने गुन्हे दाखल करुन निलंबीत करण्याची मागणी
१० लाखांची शासनाने मदत करुन पुर्नवसन करावे
मुख्यमंत्र्यांकडे डॉ.सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांची मागणी
परभणी जिल्हा पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांना निवेदन देवून चालू असलेले आंदोलन व न्यााय न मिळाल्याची आठवण करुन दिलेले आहे. परभणी येथील संविधान प्रतिकृती विटंबनेचा निषेध करण्यासाठी परभणी शहर शांततेत बंद करण्यात आले होते. परंतु या आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी काही समाज विघातक शक्ती घुसल्यानंतर बंदला हिंसक वळण लागले. यानंतर पोलीसांनी आंदोलन शमविण्यासाठी लाठीमार, आश्रु धुरांच्या नळकांड्या फोडल्या व आंदोलन शांत झाले. परंतू सायंकाळी पोलीसांनी कोंबिंग ऑपरेशन करुन आंबेडकरी वस्त्यांमध्ये कार्यकर्ते, महिला, अल्पवयीन व वयोवृध्द यांना ताब्यात घेवून अमानुष मारहाण केली.
शहीद सुर्यवंशी यांचे स्मारक बनविण्याची
या मारहाणीत सोमनाथ सुर्यवंशी याचा नाहक बळी गेला. आंबेडकर चळवळीचे नेतृत्व करणारे विजय वाकोडे यांना देखील पोलीसांच्या आंदोलन दडपशाहि केल्यामुळे मानसिक धक्क्याने ह्रदय विकाराने त्यांचा मृत्यू झाला. या संपुर्ण प्रकाराची सिटींग न्यायाधिशांच्या मार्फत न्यायालयीन चौकशी करावी, कलम १७६ (१ ए ) सिआरपीसी अन्वये प्रकरणाची चौकशी करावी, पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड सह पोलीस निरीक्षक मरे, तुरणर व इतर पोलीस अधिकार्यांवर कलम ३२ अन्वये,अॅट्रोसिटी कायद्यान्वये कलम ३ (१) आणि ३(२) प्रमाणे गुन्हे दाखल करुन सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा.
मारहाण करणार्या पोलीसांवर तातडीने गुन्हे दाखल करुन निलंबीत करण्याची मागणी
परभणी शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील सिसिटीव्ही जप्त करुन तपासावे, शहिद सोमनाथ सुर्यवंशी व लोकनेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांना शासनाने प्रत्येकी १ कोटी रुपये आर्थिक मदत करुन मयत सुर्यवंशी व लोकनेते वाकोडे यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस तातडीने शासकीय नौकरी देवून त्यांचे पुर्नवसन करावे, सद्या शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यात येत असलेल्या महिलेला मारहाण करण्यात आलेल्या वच्छलाबाई मानवते व इतर आंबेडकरी युवकांना मारहाण करणार्या पोलीसांवर तातडीने ३५४/३०७ अंतर्गत गुन्हे दाखल करुन निलंबीत करावे.
१० लाखांची शासनाने मदत करुन पुर्नवसन करावे
मानवते यांना १० लाखांची शासनाने मदत करुन पुर्नवसन करावे, न्यायालयीन कोठडीत असलेल्या व उपचार घेत असलेल्या सर्वांचे पुन्हा एकदा न्यायाधिशांच्या उपस्थितीत मेडीकल करावे, पोलीस कोंबीग कारवाईत जखमींना तातडीने आर्थिक मदत करुन आंदोलन कर्त्यांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे काँग्रेस अनुसुचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांच्या नेतृत्वाखाली आकाश लहाने, राहुलकुमार साळवे, गौतम मुंढे, सुधिर कांबळे, मिलींद खंदारे, बुध्दभुषण हत्तीअंबीरे, अमित काळे, अजय राक्षे आदिंनी केली आहे.