आपला जिल्हा आपली बातमीपरभणी जिल्हा

Parbhani: सरपंचासह पती, ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Listen to the audio version of this article (generated by AI).

Parbhani: सरपंचासह पती, ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश…!

परभणी/रामेटाकळी (Parbhani):- शासनाकडून वेगवेगळ्या योजनेत मिळालेल्या अनुदानातून संगणमत करत १ कोटी ४१ लाख रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी वांगी- कुंभारी ग्रामपंचायतचे सरपंच, त्यांचे पती व ग्रामसेवक या तिघांवर गुन्हा (Crime) दाखल करण्याचे आदेश मानवत येथील मुख्य न्यायदंडाधिकारी जी.ए. करजकर यांनी दिले आहेत.

परभणीच्या मानवत मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे निर्देश

१ कोटी ४१ लाख एवढी रक्कम प्राप्त

परभणीच्या मानवत मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे निर्देश

या बाबत अधिक माहिती अशी की, वांगी येथील शेतकरी राधाकृष्ण एकनाथराव मुळे यांनी या प्रकरणी तक्रार केली होती. वांगी – कुंभारी ग्रामपंचायतचे सरपंच निता चौधरी, त्यांचे पती नंदकुमार चौधरी, ग्रामसेवक मन्मथ साखरे यांनी संगणमत करत फेब्रुवारी २०२१ पासून शासकीय निधीत अपहार केला. १ कोटी ४१ लाख एवढी रक्कम प्राप्त झाली. त्यावर सरपंचाऐवजी त्यांच्या पतीने स्वाक्षर्‍या केल्या. अनेक नियमबाह्य कामे केली. कागदपत्रावर खर्च दाखविला. मात्र चांगल्या प्रतिची कामे केली नाही. या संदर्भात गटविकास अधिकारी, तहसिलदार, उपविभागीय अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विभागीय आयुक्तांकडे (Divisional Commissioner) तक्रार दाखल करण्यात आली. मात्र दखल घेण्यात आली नाही.

 

१ कोटी ४१ लाख एवढी रक्कम प्राप्त

मानवत येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात अ‍ॅड. एम.एस. कुलकर्णी कुंभारीकर, अ‍ॅड. आर.बी. वांगीकर, अ‍ॅड. अमोल जोशी, अ‍ॅड. एम.एम. कुलकर्णी, अ‍ॅड. मयुरी देशपांडे यांच्या मार्फत धाव घेण्यात आली. या प्रकरणात सुनावणीत वांगी – कुंभारी ग्रामपंचायतला शासनाकडून वेगवेगळ्या योजनेत १ कोटी ४१ लाख एवढी रक्कम प्राप्त झाल्या प्रकरणात वांगी – कुंभारी ग्रामपंचायतचे सरपंच, सरपंच पती, ग्रामसेवक यांनी संगणमत करत शासकीय रक्कमेचा अपहार केल्या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मानवत येथील मुख्य न्यायदंडाधिकारी जी.ए.करजकर यांनी दिले आहेत.

24 News Network

ताज्या बातम्या घडामोडी बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 9022978588. चॅनल ला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा https://www.youtube.com/@Newsnetworklive24 पोर्टल वर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा. https://24newsnetwork.live/

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button