आपला जिल्हा आपली बातमी

पत्रकार नितीन इंगळे यांना राज्यस्तरीय ‘पत्रकार रत्न’ पुरस्काराने सन्मानित.

24 न्युज नेटवर्क चॅनेल वतीने अभिनंदन

जामनेर | प्रतिनिधी – निर्भिड आणि निपक्षपणे पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे, शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी जनतेपर्यंत पोहोचविणारे तसेच लोकजागृतीसाठी उल्लेखनीय योगदान देणारे जामनेर येथील पत्रकार नितीन इंगळे यांना राज्यस्तरीय ‘पत्रकार रत्न’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

 

६ जानेवारी, मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून मलकापूर येथे हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित भव्य राज्यस्तरीय पत्रकार गौरव सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमात पत्रकार क्षेत्रातील असामान्य कार्यगौरव करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, उद्योगपती, प्रतिष्ठित नागरिक, आणि ज्येष्ठ पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत पत्रकार नितीन इंगळे यांना गौरवचिन्ह, मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.पत्रकार नितीन इंगळे यांनी सत्यशील आणि निर्भिड पत्रकारिता करत समाजातील विविध प्रश्न प्रकाशझोतात आणले. शासनाच्या विकास योजना, स्वच्छता अभियान आणि जनजागृतीवर केलेले लेखन हे लोकप्रबोधनाचे प्रभावी साधन ठरले. त्यांचा हा सन्मान पत्रकारितेच्या क्षेत्रातील नवा आदर्श निर्माण करणारा ठरला आहे.

पत्रकार बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कार्यक्रमाला जामनेर येथील पत्रकार सुनील इंगळे, सागर लव्हाळे, मोहन दुबे, मनोज महाले, शांताराम झाल्टे, अरुण तायडे, देविदास विसपुते, साहेबराव क्षीरसागर, मोहन जोशी, अनिल शिरसाट,किरण चौधरी, अक्षय वानखेडे आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नितीन इंगळे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

पत्रकार नितीन इंगळे यांना मिळालेला हा पुरस्कार पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची पावती आहे. सामाजिक प्रश्नांवर त्यांनी घेतलेली भुमिका आणि लोकशाहीला बळकटी देण्यासाठी केलेले कार्य यामुळे त्यांचा हा गौरव सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

हिंदी मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी या भव्य कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत नेटकेपणाने केले. या सोहळ्याने पत्रकार बांधवांचे मनोबल वाढविले आहे.

24 News Network

ताज्या बातम्या घडामोडी बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 9022978588. चॅनल ला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा https://www.youtube.com/@Newsnetworklive24 पोर्टल वर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा. https://24newsnetwork.live/

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button