आपला जिल्हा आपली बातमीपरभणी जिल्हा
राशन धान्याचा काळाबाजार; राशनच्या रॅकेटवर कारवाई करावी
परभणीच्या हमाल माथाडी कामगार संघटनेची मागणी
Parbhani: प्रतिनिधी गजानन साबळे
राशन धान्याचा काळाबाजार; राशनच्या रॅकेटवर कारवाई करावी
परभणीच्या हमाल माथाडी कामगार संघटनेची मागणी
परभणी (Parbhani):- राशनच्या मालाची मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत आहे. शहरातील नवा मोंढा, जुना मोंढा या भागात राशन धान्याचे रॅकेट सक्रिय झाले आहे. या प्रकरणात चौकशी करुन राशनच्या धान्याचा काळाबाजार करणार्यांवर कारवाई (action) करावी, अशी मागणी हमाल माथाडी कामगार संघटनेच्या वतीने निवेदनाद्वरे जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली आहे. निवेदनावर जफरुल्ला खान पठाण यांची स्वाक्षरी आहे.
शहरातील जुना मोंढा, नवा मोंढा भागातील काही फडीवाले ग्रामीण भागात जावून राशनचा गहू, तांदूळ खरेदी करत आहेत. हे धान्य मोठ्या व्यापार्यांना विकल्या जात आहे. राजरोसपणे सदर व्यवसाय सुरू आहे.