उमरीत पतंजलीचे स्वामी यज्ञदेव महाराजांचे भव्य योग व यज्ञ प्रशिक्षण शिबीर संपन्न
उमरीत पतंजलीचे स्वामी यज्ञदेव महाराजांचे भव्य योग व यज्ञ प्रशिक्षण शिबीर संपन्न
उमरी : (प्रतिनिधि,किशोर कवडीकर)
शहरातील मोंढा मैदानावर 7 दिवसीय भव्य दिव्य योग विज्ञान,यज्ञ एवंम ध्यान शिबीर संपन्न झाले. ज्यात हरिद्वारचे संन्यासी पु. स्वामी यज्ञदेवजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ५१ कुंडी महायज्ञ व प्रशिक्षण देण्यात आले.
13 जानेवारी ते 19 जानेवारी 2025 दरम्यान पहाटे 5ते 7 पर्यंत मोंढा मैदानावर नि:शुल्क भव्य दिव्य योग विज्ञान एवंम ध्यान शिबीर संपन्न झाले. प्रशिक्षणा दरम्यान पतंजली योग समिती जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष सुरेश लंगडापुरे , पुसद तालुका प्रभारी प्रकाश वानरे, व सौ. माधुरीताई वानरे , कंधार तालुका प्रभारी निळकंठ मोरे यांनी योग प्रशिक्षण दिले. शिबिराचे मुख्य आयोजन भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव डॉ.अमोल पा.ढगे यांनी केले होते. ह्या शिबिरा दरम्यान दररोज 8 प्रकारचे प्राणायाम, 42 प्रकारची बैठे,खडे,हाथ-पायाचे आणि पाठ व पोटावरचे सर्व कठीण- सामान्य आसने,सूर्यनमस्कार , योगीक जॉगिंग ,12 प्रकारचे तरुणांसाठी दंड आसने-बैठक,ध्यानधारणा याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले.
सर्व योग साधकांना दररोज विविध प्रकारचे ज्यूस मोफत देण्यात आले. यासाठी गोविंद अट्टल, शंकरराव माली पाटील, गंगाधर पाटील पुयड, आदेश जैन, गणेश मदने,गजानन करखेलीकर आदींचे योगदान लाभले. योग शिबिराच्या समारोपप्रसंगी पतंजली योगपीठ हरिद्वार चे संन्यासी संन्यासी पूजन स्वामी यज्ञदेवजी महाराज यांच्यामध्ये प्रशिक्षण प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडले. यावेळी १०० योग साधक महिला पुरुषांनी पांढरे वस्त्र परिधान करून यज्ञ प्रशिक्षण घेतले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी बालाजीराव येरावार, गंगाधर पाटील पुयड, गोविंदसेठ अट्टल, डॉ.अविनाश पा.ढगे,
केदार चिटमलवार,गणेश चव्हाण,प्रल्हाद पाटील जोगदंड,पंडितराव बेंबरे,चव्हाण बुध्दाजी,गजानन करखेलीकर,गणेश देवराये गुरुजी,करखेलीकर गजानन, अक्कलवाड गणेश,गणेश मदने, कमलाकांत उत्तरवार, माधव जंगेवाड, गंगाधर कस्तुरे,विद्याताई अग्रवाल, करुणा खंडेलोटे, सुरेखा गोकावार ,कविता हामंद, विजयमाला ताटीकुंडलवार,गोदावरी धानोरकर,रेणुका भुजबळे,विजया राउलवार,शकुंतला चव्हाण आदिसह परिश्रम घेतले.