महिला विशेष

चालण्याच्या पद्धतीत केलेला ‘हा’ छोटा बदल, स्नायूंची शक्ती व मेंदूची तीक्ष्णता वाढवायला करतो मोठी मदत

तुम्हाला तर माहीतच असेल साधारण अनेक गाड्यांमध्ये रिव्हर्स गिअर असतो. आपत्कालीन स्थिती किंवा गरजेनुसार स्वतःला एखाद्या ठिकाणी फिट करण्यासाठी हाच गिअर कामी येतो. त्याचप्रमाणे मानवी शरीरात पण मागे येण्याची क्षमता असते. माघार घेण्याने ज्या पद्धतीने तुम्हाला संकटाच्या स्थितीपासून लांब राहता येतं त्याच प्रमाणे मागे चालण्याने म्हणजेच उलट्या दिशेने चालल्याने तुमच्या आरोग्याला सुद्धा काही फायदे होऊ शकतात. उलट्या दिशेने चालणे हे डाव्या आणि उजव्या मेंदूच्या समन्वयासाठी, तसेच ३६० -डिग्री (पूर्णपणे) जागरुकतेसाठी सर्वोत्तम कार्य करते. तुमची प्रतिसाद, प्रतिक्रिया, विरोध किंवा स्वीकार करण्याची क्षमता सुधारण्यासाठी या पद्धतीने चालणे उपयुक्त ठरते. होलिस्टिक हेल्थ एक्सपर्ट डॉ मिकी मेहता यांनी इंडियन एक्सस्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार याविषयी सविस्तर जाणून घेऊया..

उलट्या दिशेने चालणे हे रेट्रो वॉक किंवा रिव्हर्स वॉक हे शारीरिक हालचालीचा समन्वय साधण्यासाठी मदतीचे ठरू शकते असे सिद्ध करण्यासाठी पुरेसे संशोधन आवश्यक आहे. पुढे चालण्याच्या तुलनेत पाठीमागच्या दिशेने चालल्याने स्नायू नीट सांधले जातात. यामुळे पायातील स्नायू सक्रिय आणि मजबूत होऊ शकतात. विशेषत: क्वाड्रिसेप्स, हॅमस्ट्रिंग, ग्लूट्स आणि पोटऱ्यांच्या स्नायूंच्या विकासामध्ये याची मदत होऊ शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button