अपरिचित इतिहासनोकरी विशेषमनोरंजनमहाराष्ट्र ग्रामीण
आश्रम शाळा खर्डे दिगर शाळेच्या छताचे प्लास्टर कोसळून चार विद्यार्थिनी जखमी
आदिवासी विकास प्रकल्प कळवण अंतर्गत असलेल्या शासकीय आश्रम शाळा खर्डे दिगर शाळेच्या छताचे प्लास्टर कोसळून चार विद्यार्थिनी जखमी खाजगी वाहनाने जखमी विद्यार्थिनींना पुढील उपचारासाठी जयदर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले सदर आश्रम शाळेत घाणीचे साम्राज्य स्वच्छतेचा अभाव पावसामुळे इमारत पूर्णपणे गळत असल्याने ही घटना घडली यापूर्वी विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या आढळून आल्या होत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वचक नसल्यानेच शासकीय आश्रम शाळेवर अशा घटना घडत असतात घटना घडली त्यावेळेस शाळेत मुख्याध्यापक अधीक्षक हजर नव्हते