आपला जिल्हा आपली बातमीआर्थिक घडामोडीउद्योग विश्वनोकरी विशेषपरभणी जिल्हामहाराष्ट्र ग्रामीणमहिला विशेष

उमरीत जुगार अड्डे मटका बेफाम पोलिसांची कारवाई मात्र शून्य..

शहरात अवैध धंद्यात वाढ झालेलं दिसत आहे, तरुणांचा वाढता कल आणि पोलिसविभागाचे त्याकडे जाणीवपूर्वक झालेलं दुर्लक्ष

उमरीत जुगार अड्डे मटका बेफाम पोलिसांची कारवाई मात्र शून्य… 

उमरी – (प्रतिनिधी किशोर कवडीकर)  गेल्या काही दिवसापासून तरुणाई मध्ये वाढत असलेल्या कमी गुंतवणुकीत जास्त नफा कमवण्याच्या मानसिकतेमुळे अवैध धंद्याकडे अनेक तरुणाचा कल वाढला आहे, त्याचाच फायदा घेत शहरात अवैध धंद्यात वाढ झालेलं दिसत आहे, तरुणांचा वाढता कल आणि पोलिसविभागाचे त्याकडे जाणीवपूर्वक झालेलं दुर्लक्ष यामुळे अवैध धंदे करणाऱ्याना जणू मोकळेच रान मिळाले आहे असे दिसून येत आहे, शहरातील विविध भागात सुरू असलेल्या अवैध धंद्यामुळे आता शहरात अवैध धंद्यांना जणू (एन वो सी)च दिले की काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेमध्ये उपस्थित केला जात आहे ,शहरातील मच्छी मार्केट गोरठा पॉईंट या चौकामध्ये जोरदार मटक्याचे दुकान मांडले आहेत, सध्याच्या महागाईच्या काळात व सुशिक्षित बेरोजगार तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे कमी गुंतवणुकीत जादा नफा कमावण्याच्या नादात जुगार,मटका अशा अवैध धंद्याकडे शहरातील व ग्रामीण भागातील तरुणांचा कल वाढत चालला आहे,एवढेच नव्हे तर यामध्ये शासकीय कर्मचारी सुद्धा सट्याच्या आहारी गेले आहेत मात्र या नादात पैसा मिळवण्यापेक्षा गुन्हेगारीची संख्या वाढत आहे, त्यातूनच कर्जबाजारीपणा आणि नशेच्या आहारी जाणारे तरुण अनअपेक्षितपणे गुन्हेगारीकडेही वळत आहेत, या सट्टा पट्टीच्या नादी लागून कित्येक तरुण आकडेमोड गणिताचा अभ्यास करताना दिसत आहेत या अवैध धंद्यामुळे कित्येक कुटुंब उध्वस्त केले आहेत ,तरीही या अवैध धंद्याला आळा बसत नाही, या व्यवसायाबद्दल अरडाओरड झाल्यास काही दिवस हे व्यवसाय छुप्या पद्धतीने चालतात,पुन्हा काही दिवसानंतर परिस्थिती जैसे थे असते, उमरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुलेआम मटक्याचे अवैध व्यवसाय सुरू आहेत मात्र असे असतानाही यांच्यावर पोलीस प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होत नसल्याचे दिसून येते त्यामुळे आता जिल्हा पोलीस अधीक्षक यांनीच या गंभीर बाबीकडे लक्ष पुरवावे असे नागरिकाकडून मागणी होत आहे.

24 News Network

ताज्या बातम्या घडामोडी बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 9022978588. चॅनल ला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा https://www.youtube.com/@Newsnetworklive24 पोर्टल वर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा. https://24newsnetwork.live/

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button