शासकीय आश्रम शाळा वस्तीगृह रोजंदारी कर्मचाऱ्यांचे उपोषण.
आदिवासी विकास प्रकल्प कळवण अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रम शाळा वस्तीगृह रोजंदारी कर्मचाऱ्यांचे 21 ऑगस्ट पासून उपोषण सुरू 2023 24 या शैक्षणिक वर्षात 340 रोजंदारी कर्मचाऱ्यांना आदेश देण्यात आले होते चालू शैक्षणिक वर्ष 2024 25 या शैक्षणिक वर्षात 258 कर्मचाऱ्यांना रोजंदारीचे आदेश देण्यात आले परंतु उर्वरित 82 कर्मचाऱ्यांना मात्र आदेश देता येणार नाही असे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कळवण यांनी सांगितले त्यानंतर रोजंदारी कर्मचारी संघटनेच्या वतीने 12 व 18 जुलै रोजी आदिवासी विकास आयुक्त नाशिक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संघटनेच्या वतीने चर्चा करण्यात आली त्यावर आयुक्त महोदय यांनी सांगितले की सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांना आदेश देण्यात येतील परंतु आयुक्त महोदया यांनी सांगितल्यावर सुद्धा प्रकल्प अधिकाऱ्यांनी रोजंदारी कर्मचाऱ्यांचे आदेश देण्यास टाळाटाळ केली आयुक्त महोदय यांच्या आदेशाला मात्र कळवन प्रकल्प अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली सदर प्रकल्प अधिकाऱ्यांनी आदिवासी विकास आयुक्तांचे आदेश न मानता स्वतःच्या मर्जीने कामकाज करणे म्हणजे हुकूमशाही यापूर्वीच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी नियमितपणे रोजंदारी कर्मचाऱ्यांचे आदेश काढले परंतु नवीन प्रकल्प अधिकारी विनाकारण रोजंदारी कर्मचाऱ्यांना त्रास देत आहेत आयुक्त महोदय आपण स्वतः कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सहकारात्मक निर्णय घेऊन सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांना कामावर घ्यावे अशी विनंती कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे जोपर्यंत रोजंदारी कर्मचाऱ्यांचे आदेश मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील असे रोजदारी संघटनेचे वतीने माजी आमदार जे पी गावित किसन गुजर किरण गांगुर्डे आदी पदाधिकारी यांच्या वतीने जाहीर करण्यात आले.