सातारा – पाटण तालुक्यात अवैध धंद्याचा महापूर चालू
RPI चे पाटण तालुका आध्यक्ष विकास कांबळे यांनी दिले निवेदन.
सातारा – पाटण तालुक्यात अवैध धंद्याचा महापूर चालू….
पाटण तालुक्यात ठीक ठिकाणी मटक्या चे अड्डे चालू आहेत ह्याची तक्रार RPI चे पाटण तालुका आध्यक्ष विकास कांबळे यांनी दिनांक 20/12/2023 रोजी लेखी निवेदन
दिले होते. परंतु प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई केली. त्यामुळे काही दिवसच हे अवैध धंदे बंद झाले. परंतु काही दिवसाने ते पुन्हा नेहमीप्रमाणे चालू झाले.त्यामध्ये पाटण शहर, नवारस्ता, कोयना, तारळे अनेक भागात मटक्याचे अड्डे तरुणांचे लक्ष वेधून घेत आहेत. तरुणांचा व्यवसायाच्या दृष्टीने आगोदरच पाटण तालुका मागासलेला आहे. अनेक तरुण-तरुणी रोजी रोटी साठी शहरांमध्ये जात आहेत. आणि उर्वरित तरुण झटपट श्रीमंत होण्याच्या आशेने तरून पिढी खराब होत आहे. प्रशासनाच्या वेळोवेळी लक्षात आणून दिले जात आहे परंतु त्यावर कोणती कारवाई होत नाही. अवैध धंद्यावर कारवाई झाली नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष माननीय श्री दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली पाटण तालुका अध्यक्ष विकास कांबळे यांच्यावतीने गळ्यात मटक्यांच्या चिठ्ठ्यांचे हार घालून मोठ्या संख्येने प्रशासनाच्या कार्यालयावर आंदोलन करू असा इशारा देण्यात आला.