मुसळधार पावसाने परभणी जिल्ह्यात पुरस्थिती; बचावकार्यासाठी एनडीआरएफची बटालियन दाखल
एनडीआरएफच्या बटालियनने तत्काळ दाखल होत बोधा गावामध्ये मदत कार्य सुरू केले आहे
मुसळधार पावसाने परभणी जिल्ह्यात पुरस्थिती; बचावकार्यासाठी एनडीआरएफची बटालियन दाखल
एनडीआरएफच्या बटालियनने तत्काळ दाखल होत बोधा गावामध्ये मदत कार्य सुरू केले आहे
परभणी : (गजानन साबळे) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोबतच महसूल यंत्रणा जिल्ह्यातील पाऊस आणि नदीकाठच्या गावांमध्ये ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना मदतीसाठी उतरली आहे. सोबतच जिल्ह्यात एनडीआरएफची बटालियन तुकडी सुद्धा पाचारण करण्यात आली आहे. या तुकडीकडून सेलू तालुक्यातील बोध गावांमध्ये सोमवारी सकाळी मदत कार्य करण्यात आले. यात चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग पावसाच्या संभाव्य परिस्थितीमुळे ऑन फिल्ड उतरले आहेत. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात सुरू असलेल्या पाऊस पाहता विविध ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चे आपदा मित्र आणि त्यांच्यासोबत अग्निशमन विभाग कार्यरत ठेवण्यात आले आहेत. एनडीआरएफची बटालियन जिल्ह्यासाठी विभागीय स्तरावर राखीव ठेवण्यात आली होती. ही तुकडी जिल्ह्यात दाखल झाली आहे. यामध्ये निमलष्करी दलाच्या जवान असून ते मदत कार्य करण्यासाठी माहिती मिळेल त्या गावांमध्ये जाऊन सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.