धनगर समाज बांधवांना एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी .
सकल धनगर समाजाच्या वतीने बोरी पोलीस स्टेशनला निवेदन
धनगर समाज बांधवांना एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी .
सकल धनगर समाजाच्या वतीने बोरी पोलीस स्टेशनला निवेदन
बोरी/प्रतिनिधी
बोरी परिसरातील सर्व सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने धनगर समाजाला एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी पंढरपूर नेवासा लातूर व इतर ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे .
सर्व उपोषणार्थींना जाहीर पाठिंबा म्हणून बोरी पोलीस ठाण्या मार्फत मुख्यमंत्री यांना मध्ये 23 सप्टेंबर रोजी सकल धनगर समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्र मध्ये विविध ठिकाणी आरक्षणासाठी आंदोलने सुरू आहेत.
या निवेदनात म्हटले आहे की संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाज हा पिढ्यानपिढ्या पासून मेंढपाळांचा व्यवसाय करीत अत्यंत शांत संयमी व कबाड कष्ट करणाऱ्या बहुतांश धनगर समाज हा महाराष्ट्रातील आर्थिक जडण घडणातील एक महत्त्वाचा घटक आहे.
परंतु सध्या धनगर समाज बांधवांच्या पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी या जमातीचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
याबाबत अनेक वर्षापासून शासनाकडे विविध प्रकारची आंदोलने रस्ता रोको तीव्रतेने मागणी केली जात आहे.
मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विविध ठिकाणी रास्ता आंदोलन तसेच शांततेच्या मार्गाने धनगर समाज आंदोलन करीत आहे . तसेच सध्या पंढरपूर,नेवासा लातुर आशा विविध ठिकाणी गेल्या पंधरा दिवसापासून अमर उपोषण सुरू आहेत.
या उपोषणकर्तेना पाठिंबा म्हणून बोरी व परिसरातील सकल समाजाच्या वतीने पोलीस स्टेशन मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन शासनाने सहानभूतीपूर्वक विचार करून धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत आवश्यक विचार करावा अशी मागणी केली आहे. यांनी निवेदनावर दगडू वजीर, अंकुश बकान, वामन शिंपले, मंजीराम गलांडे ,हरिभाऊ गारूडी ,अशोक शिंपले, संजय घनवटे विशाल घोलप, बळीराम काळे ,सिताराम बकान,अमोल बकान ,गजानन पावडे ,गणेश गोरे ,मोहन बकान रत्नेश्वर बकान ,शेषराव शिंपले माणिक वैद्य ,पद्माकर शिंपले, रवींद्र वारकड ,पवन वारकड, मुंजाजी बकान ,यांच्या आधीच्या स्वाक्षऱ्या आहेत.