चांदवड फार्मसिचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पदव्युत्तर पदवी परीक्षेत मुल्हेर येथील एत्तेश्याम मुख्तार शेख प्रथम
चांदवड फार्मसिचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पदव्युत्तर पदवी परीक्षेत मुल्हेर येथील एत्तेश्याम मुख्तार शेख प्रथम
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे एप्रिल २०२३मध्ये घेण्यात आलेल्या एम.फार्मसी परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे.या परीक्षेत चांदवड येथील एस एन जे बी संचलित श्रीमान सुरेश दादा जैन औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील एम फार्मसी रेगुलेटरी अफेअर्स महाविद्यालयात २०२१ ते२०२३ मध्ये सुरु करण्यात आलेल्या पाहिल्या बैचचा विद्यार्थी एत्तेश्याम अहमद मुख्तार शेख याने(सीजीपीए८.९९ ८३.८४टक्के) मिळवत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पदव्यूत्तर पदवी परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला. हृतिक वैष्णव (सीजीपीए८.५२ ७७.३६ टक्के)याने विद्यापीठ परीक्षेत पाचवा तर सोनाली अमृकर (सीजीपीए८.४८ ७८.५२ टक्के)हिने साहवा क्रमांक मिळवला.विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. सी.डी.उपासनी,डॉ. आतिश मुंदडा,डॉ. गणेश बासरकर, डॉ.एस. बी.पाटील,प्रा.डॉ. लोकेश कोठारी,उप प्राचार्य डॉ. अमन उपगनलवार यांचे मार्गदर्शन मिळाले.यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या विश्वस्थ प्रबंध समितीच्या पदाधिकाऱ्यानी अभिनंदन केले.तसेच मुल्हेर गावातील मुस्लिम पंच कमिटी मुल्हेर तसेच गावातील सर्व मित्रपरीवारातर्फे एत्तेश्याम शेख यांचे अभिनंदन करण्यात आले.
मेहमुद मन्सूरी,(दिंडोरी तालुका प्रतिनिधी)