क्रांतिवीर लहुजी साळवे मित्र मंडळ घनसोली व कोपरखैरणे यांच्यातर्फे
मुंबई हायकोर्टाचे वकील श्री ज्ञानेश्वर हनवते साहेब यांच्या ऑफिसमध्ये सेक्टर एक घनसोली येथे वकील साहेबांचा 1 डिसेंबर 2024 वार रविवार रोजी वाढदिवस साजरा.
क्रातिवीर लहुजी साळवे मित्र मंडळ घनसोली व कोपरखैरणे यांच्यातर्फे मुंबई हायकोर्टाचे वकील श्री ज्ञानेश्वर हनवते साहेब यांच्या ऑफिसमध्ये सेक्टर एक घनसोली येथे वकील साहेबांचा 1 डिसेंबर 2024 वार रविवार रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त सर्वांना आवाहन करण्यात आले होते ते सर्व कार्यकर्ते सभासद एका आवाजामध्ये मित्र मंडळाचे बरेच पदाधिकारी सभासद सर्व कार्यकर्ते साहेबांच्या ऑफिस कडे धाव घेत आले कारण वकील साहेबावर सर्वजण एवढे प्रेम करतात की त्यांचं प्रेम ओत पोत भरून ओसंडून वाहत होतं वकील साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जमा झालेला जो तो कार्यकर्ता आपले मनोगत व्यक्त करीत होता. वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेले मान्यवर , ऍड शफिक खान सर, ऍड. गजानन चवरे , ऍड. नामदेव हनवते , संतोष गायकवाड, परमेश्वर गायकवाड, ईश्वर गायकवाड, संतोष गायकवाड, नितीन बांगर, अजय गायकवाड, संतोष वाघमारे, नारायण आव्हाड,सुदाम डोके, शरद गायकवाड, सुरज कांबळे अनेक मान्यवरांच्या उपस्थित साहेबांचा वाढदिवस चांगला झाला.
एड. ज्ञानेश्वर हनवते साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या ऑफिसमध्ये आम्हाला सतत भेडसावणारी एक समस्या म्हणजे आम्हाला हक्काचं समाज मंदिर याची आठवण झाली कारण साहेबांच्या ऑफिसमध्ये खूप गर्दी झाली होती कार्यकर्त्यांना जागा अपुरी पडली अशा परिस्थितीमध्ये आपण एकत्रितपणे कुठे एखाद्या कारणा निमित्त जमा व्हायचं म्हटलं की लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात जमा होते, अशा एखाद्या कारणानिमित्त जर जमा झाली तर आपण कुठे उभे राहणार, कुठे थांबणार कसा कार्यक्रम घेणार, उदाहरणार्थ आपल्यापैकी कोणाच्याही हळदी समारंभ असो, वाढदिवस असो, बाळाचं नामकरण असो या बाबीसाठी समाज मंदिर प्रामुख्याने किती अति आवश्यक आहे . ही समस्या आम्हाला जाणवली आणि आता याचा छेडा घेण्याचा आम्ही ठरवल आहे त्याचा पाठपुरावा घ्यायचा आहे. नवी मुंबई ऐरोली विधानसभा चे नवनिर्वाचित आमदार लोकनेते श्री गणेशजी नाईक साहेब यांना श्री योगेश चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून साकडे घालणार आहोत की, उदाहरणार्थ साठे नगर दिघा, साईबाबा नगर दिवा गाव, विष्णुनगर दिघा, नवशील नाका रबाळे, तुर्भे स्टोअर तुर्भे, अशा कितीतरी ठिकाणी अण्णाभाऊ साठे समाज मंदिर नगरपालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या जागेत बांधून देण्यात आलेले आहेत त्याच धर्तीवर आम्हालाही सुद्धा म्हणजेच घनसोली कोपरखैरणे मित्र मंडळ यांच्यासाठी घनसोली येथे 40 बाय 50 स्क्वेअर फुटाचे समाज मंदिर लवकरात लवकर बांधून देण्यात यावे ही गर्जना व विनंती आम्ही घेऊन जाणार आहोत. हीच एड.ज्ञानेश्वर हनवते साहेबांना वाढदिवसानिमित्त खूप मोठी शुभेच्छा होईल. आम्ही लोकनेते गणेशजी नाईक साहेब आमदार साहेबांचे सदैव आभारी राहील. इथून पुढे जे समाज उपयोगी जनसेवा करता येईल ते कार्य जतन करू असे आम्ही ग्वाही देतो. पुनश्च एकदा एड. ज्ञानेश्वर हनवते सर्वांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. दिल्या व त्याचे उत्तरदायित्व म्हणून एड. ज्ञानेश्वर हनवते साहेबांनी आभार प्रदर्शन व्यक्त करून सर्वांना धन्यवाद मानले.